शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारेगाव येथील शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By admin | Updated: July 5, 2015 02:24 IST

शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ निश्चित असते. मात्र कारेगाव (रामपूर) येथील शाळेला हा नियम लागू नसल्याचीच परिस्थिती होती.

मनमानी कारभार : मुख्याध्यापकाची बदलीरुंझा : शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ निश्चित असते. मात्र कारेगाव (रामपूर) येथील शाळेला हा नियम लागू नसल्याचीच परिस्थिती होती. या प्रकारातूनच पालकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. अखेर मुख्याध्यापकाची बदली करण्यात आली. शिवाय उर्वरित शिक्षकांना समज देण्यात आली. पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत कारेगाव (रामपूर) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग आहे. पटावर ६५ विद्यार्थी आहे. सर्व वर्गांसाठी सात शिक्षक मंजूर आहे. यातील एक शिक्षक गेली एक वर्षांपासून गैरहजर आहे. कार्यरत सहा शिक्षकांचीही मनमानी मागील काही वर्षांपासून सुरू होती. शाळेची वेळ सकाळी ११ ते ५ असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना वाटेल तेव्हा शाळा उघडणे आणि बंद करण्याचा नित्यक्रम सुरू होता. शुक्रवारी ४ वाजताच वर्ग सोडून देण्यात आले. पाल्य शाळा सुटण्याच्या वेळेच्या आतच घरी पोहोचल्याने त्यांना पालकांकडून विचारणा सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कानावरही ही बाब टाकण्यात आली. सर्व पालकवर्ग शाळेवर धडकला. त्यांनी कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या बाबीची माहिती पंचायत समितीला कळविण्यात आली. शनिवारी पंचायत समितीचे अधिकारी कारेगावात धडकले. गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी दाखल झाले. त्यांनी उपस्थित शिक्षकांना होत असलेल्या प्रकाराविषयी जाब विचारला.यानंतर गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तत्काळ मुख्याध्यापकाच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. यानंतर दुपारी ४ वाजता शाळेचे कुलूप उघडण्यात आले. (वार्ताहर)