शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कर्ज देता का कुणी कर्ज?

By admin | Updated: November 26, 2015 02:56 IST

नोकरीसाठी वणवण भटकूनही पदरी निराशा आलेले शेकडो तरुण आता व्यवसाय उभारणीसाठी धडपडत आहे.

बेरोजगारांचा टाहो : बँकांकडून केली जातेय थट्टाखुशाल खंदारे  धनोडानोकरीसाठी वणवण भटकूनही पदरी निराशा आलेले शेकडो तरुण आता व्यवसाय उभारणीसाठी धडपडत आहे. कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. मात्र बँकांकडून या तरुणांची थट्टा चालविली जात असून कर्ज देता का कुणी कर्ज असा टाहो शेकडो बेरोजगार महागाव तालुक्यात फोडताना दिसत आहे.महागाव तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नाही. गुंज येथे असलेला एकमेव साखर कारखानाही बंद पडला आहे. त्यामुळे तालुक्याच्या बेरोजगारीत भर पडली. सहकारी तत्वावरील कापूस प्रक्रिया उद्योगही बंद झाले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांची फौज महागाव तालुक्यात निर्माण झाली आहे. अनेक जण पोटाची खडगी भरण्यासाठी महानगराकडे धाव घेत आहे. तर काही तरुण गावातच उद्योग व्यवसाय उभारण्याच्या तयारीत आहे. उद्योग व्यवसाय म्हटला की भांडवलाचा प्रश्न आला आणि भांडवलासाठी हवा असतो पैसा आणि हाच पैसा अनेकांजवळ नाही. शासनाच्या विविध योजनांतून लघु उद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज दिले जाते. प्रसिद्धी माध्यमातून त्याची माहिती दिली जाते. विविध महामंडळाच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. एखादा तरुण उद्योग उभारण्यासाठी बँकेत कर्जासाठी जातो. तेव्हा त्याला वेगळाच अनुभव येतो. बँकेच्या जाचक अटी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीने बेरोजगाराला कर्ज नको, अशी म्हणण्याची वेळ येते. अनेक तरुणांनी तर शेवटच्या टप्प्यात कर्ज नको असे म्हणत उद्योग व्यवसाय करण्याचे स्वप्न गुंडाळून ठेवले आहे.कागदपत्रे मंजुरी आदी घेताना काय आटापीटा करावा लागतो हे त्या बेरोजगारालाच माहीत असते. एक दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी त्याला मानसिक यातना सहन कराव्या लागते. शेवटी बँक कर्ज मंजूरही करते. ते केवळ २० ते ३५ हजार रुपयांचे. एवढा मोठा आटापिटा केल्यानंतर मिळालेल्या कर्जात उद्योगही उभारता येत नाही. हाती आलेले पैसे तसेच खर्च होतात आणि कर्जाचा डोंगर बेरोजगार तरुणाच्या डोक्यावर वाढत राहतो. एकीकडे नोकऱ्या नाही आणि दुसरीकडे उद्योगासाठी कर्ज मिळत नाही, अशी अवस्था आहे.