शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त जगताहेत वेठबिगारीचे जीणे

By admin | Updated: December 11, 2015 03:04 IST

आयुष्याची शिदोरी असलेली लाखमोलाची जमीन धरणात बुडाल्यानंतर शासन सुविधा देईल, अशी आशा असलेल्या बेंबळा प्रकल्पग्रस्ताची आता पुरती फसगत झाली आहे.

आरिफ अली बाभूळगावआयुष्याची शिदोरी असलेली लाखमोलाची जमीन धरणात बुडाल्यानंतर शासन सुविधा देईल, अशी आशा असलेल्या बेंबळा प्रकल्पग्रस्ताची आता पुरती फसगत झाली आहे. बेंबळेच्या कोणत्याही पुनर्वसन झालेल्या वसाहतीत फेरफटका मारला तरी आज प्रकल्पग्रस्ताचे हाल दिसून येतात. बहुतांश प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले असून वेठबिगारीचे जीणे जगत आहे.बाभूळगाव तालुक्यातील खडक सावंगा येथे महाकाय बेंबळा प्रकल्प साकारण्यात आला. ५० कोटींचा असलेला हा प्रकल्प दोन हजार कोटींवर जावून पोहोचला. मात्र अद्यापही या धरणग्रस्तांच्या समस्या कायम आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. सुरुवातील कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासकीय नोकरीत पाच टक्केच जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे ते आश्वासनही फोल ठरले. बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित मुलांनी नोकरीकरिता आवश्यक असणारी वयोमर्यादाही ओलांडली आहे. मात्र त्यांना नोकरीत सामावल्या गेले नाही. आता एचबार झालेले अनेक प्रकल्पग्रस्त मोठ्या पदव्यॉ घेवूनही दुसऱ्या कामावर राबताना दिसत आहेत. धरणग्रस्तांसाठी असलेल्या नोकऱ्यांची किती वाट पाहावी लागेल, हा कळीचा मुद्दा आहे.धरणा धरणामुळे मोठे शेतकरी अल्पभूधारक झाले तर अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. अल्प मिळालेल्या मोबदल्यात इतरत्र शेती मिळू शकली नाही. त्यामुळे हाती आलेला पैसा खर्च झाला. यामुळे त्याला आता दुसऱ्याच्या मजुरीवर जाण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. बेंबळा धरणाला तसा बुडित क्षेत्रातील नागरिकांचा प्रखर विरोध होता. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी बाभूळगावात येवून धरणाविरोधात रणशिंग फुंकले होते, जंगी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी इतर धरणाची व्यथा यावेळी सांगितली होती. पंरतु सरकारपुढे कुणाचेही चालले नाही. आता वेळ निघून गेली. काळ कुणासाठी थांबत नाही. परंतु या धरणग्रस्तांच्या व्यथांना वाचा फोडायलाही कुणी येत नाही. न्यायालयात जाणे हा एकमेव पर्याय प्रकल्पग्रस्तांसमोर शिल्लक आहे.