शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गाडेघाटातील आदिवासी जगताहेत उपेक्षिताचे जीणे

By admin | Updated: May 26, 2016 00:03 IST

राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही.

समस्यांची गर्दी : शासकीय योजनांचा पत्ता नाहीकिन्ही (जवादे) : राळेगाव तालुक्यातील गाडेघाट हे संपूर्ण आदिवासी समाजाचे गाव. विकास नावाची गोष्टच या गावाला माहीत नाही. या बाबी तर दूर मुलभूत सुविधाही त्यांना उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवार गाठावे लागते. एवढेच काय तर सदर गाव ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येते तेथील सचिवाचेही कधी या गावाला दर्शन झाले नाही. समस्यांच्या गर्दीत हे गाव सापडले आहे. पिंपरी (सावित्री) या ग्रामपंचायत अंतर्गत गाडेघाट या गावाचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडून कुठल्याही योजनांचा लाभ या भागाला दिला जात नाही. वैयक्तिक सुविधाही पुरविल्या जात नाही. आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या या गावामध्ये गावकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी साधा हातपंपही नाही. गावशिवारात असलेल्या शेतातून पाणी आणावे लागते. सांडपाण्याच्या नाल्या नेमक्या आहे. त्याही कधी स्वच्छ केल्या जात नाही. कचऱ्याने भरलेल्या नालीमुळे दुर्गंधी वाढली आहे. ग्रामपंचायतीचा कर्मचारी कधीही या भागात फिरकत नाही. वीज खांबावर पथदिवे नाही. अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रचंड हाल सोसावे लागते. सर्वत्र पाणी साचून राहते. कालांतराने त्याचे रूपांतर गटारामध्ये होते. त्यात तयार होणारे डास आरोग्यासाठी घातक ठरते. पिंपरी(सावित्री) ग्रामपंचायतीला असलेल्या ग्रामसचिवाचे गाडेघाटकडे दुर्लक्षच नाही, तर त्यांचे कधी या गावाला दर्शनच झाले नाही. काम पडल्यास आदिवासी बांधवांना त्यांचा शोध घ्यावा लागतो. शासनाच्या विविध योजना पिंपरी(सावित्री)मध्येच जिरतात. पदाधिकारी आणि सचिवांना या गावाशी काहीएक देणे-घेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोप या गावातील रामेश्वर सिडाम यांनी केला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक शौचालय, सिंचन विहीर आदी योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचत नाही. पात्र असूनही लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर दिले जात नाही. परिणामी या गावातील नागरिकांना उपेक्षित जीणे जगावे लागत आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर) राळेगाव तालुक्यातील गाडेघाट म्हणजे समस्यांचे माहेरघर अशी अवस्था झाली आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही कधीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आमचा उपयोग केवळ मतदानापुरताच काय, असा सवाल आहे.