शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या आरक्षणामुळे गावपुढाऱ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देअनेक गावात हिरमोड : कळंबमध्ये पहिल्या टप्प्यात ३० ग्रामपंचायतींची निवडणूक

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यात ६१ पैकी ३० ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. अनेक मातब्बर गावपुढाऱ्यांच्या गावात सरपंचपद महिलांसाठी आरक्षित निघल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परिणामी आपलीच सत्ता ग्रामपंचायतवर राहावी, यासाठी गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.परसोडी (बु.) ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे विद्यमान सरपंच तथा बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप यांना महिलांच्या खांद्यावर गावाची धुरा द्यावी लागणार आहे. या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे यांनी पुढाकार घेतला आहे. किन्हाळाचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक सुदाम पवार यांच्या गावात सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे ते आपल्या कुंटुंबातील महिला सदस्याला समोर करण्याची शक्यता आहे.यासोबतच उमरी, धोत्रा, थाळेगाव, देवनळा, डोंगरखर्डा आदी गावातही सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यात असणाऱ्या तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या गावपुढाऱ्यांवर मात्र घरी बसण्याची वेळ आली आहे. असे असले तरी, महिलांना समोर करुन ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे सावरगाव या महत्वाच्या गावात सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गात निघाल्याने याठिकाणी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अनेक नेते तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडताना दिसतात. परंतु स्वत:च्या गावात ते किती प्रभाव टाकतात, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच