शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

लाभार्थ्यांची यादी दर्शनी भागावर लावा

By admin | Updated: June 22, 2015 02:05 IST

ग्रामपंचायतीमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. बहुतेक वेळा या योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून पैसे उकळणारेही असतात,

सीईओ : आढावा बैठक, सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदी ठराव घेण्याचे निर्देशकळंब : ग्रामपंचायतीमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. बहुतेक वेळा या योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून पैसे उकळणारेही असतात, अशा लोकांपासून कुणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.ते शुक्रवारी कळंब येथे विविध विकासकामांचा आढावा घेताना बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या विहिरींचे कामे ताबडतोब पूर्ण झाले पाहिजे. विहिरींच्या कामांसाठी ग्रामसेवकांनी जातीने प्राधान्य द्यावे. विहीर पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन तत्काळ देण्यात येणार आहे. तसेच विहीरच नाही तर इतर लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादीही ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. घरकुल बांधकामाची स्थिती, संग्राम विभागाची माहिती, वृक्ष लागवड आदीं कामांचाही त्यांनी आढावा घेतला. किती ग्रामपंचायतींच्या मासिक सभा आॅनलाईन करण्यात आल्या, नियमित ग्रामसभा घेतल्या जातात की नाही, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारी पाठ्यपुस्तके मिळाली की नाही, याचीही माहिती त्यांनी घेतली. तालुक्यात शेतकऱ्यांनी किती टक्के पेरणी केली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोफत शेती साहित्य मिळाले की नाही आदी आवश्यक बाबींचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीला गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर, शाखा अभियंता तुषार परळीकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे, रमेश केळकर, अशोक ठाकरे, राजेश साव, रतनलाल अग्रहरी, अनुराधा ठाकरे, मंगेश आंधळे, संजय दहेकर, पी.जी. निंबोकार, के.जी. खैरकार, एस.एल. ढोमणे, सुनील ताटेवार, पी.व्ही. रामटेके, दीपिका धोपटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)