शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र धर्मासाठी लिंगायत महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:36 IST

पूर्वजांचा समृद्ध वारसा, समाजाची स्वतंत्र अस्मिता जपत रविवारी लिंगायत समाजबांधवांनी यवतमाळातून राज्यव्यापी एल्गार पुकारला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी जिल्हाकचेरीवर महामोर्चा धडकला.

ठळक मुद्देशांततापूर्ण एल्गार : महाराष्ट्रासह परराज्यातील समाजबांधव यवतमाळात एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पूर्वजांचा समृद्ध वारसा, समाजाची स्वतंत्र अस्मिता जपत रविवारी लिंगायत समाजबांधवांनी यवतमाळातून राज्यव्यापी एल्गार पुकारला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी जिल्हाकचेरीवर महामोर्चा धडकला. हजारोंच्या संख्येने आलेल्या समाजबांधवांनी लक्ष वेधून घेतले.येथील समता मैदानात सकाळपासूनच महाराष्ट्रासह विविध राज्यातील लिंगायत समाजबांधव उपस्थित झाले. ‘शरणू शरणार्थी’ म्हणत एकमेकांच्या भेटी घेतल्या. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या छत्राखाली एकवटलेल्या ४८ संघटनांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात मोर्चाला प्रारंभ झाला.महामोर्चात सर्वात पुढे महात्मा बसवेश्वरांचा रथ होता. या रथातील संत बसवेश्वरांचा अर्धाकृती लक्षवेधी पुतळा जणू मोर्चाचे दिशादर्शक होते. नेतृत्व होते. सर्वात पुढे महिला, त्यानंतर पुरुषांची रांग अशा पद्धतीने मोर्चाच्या मार्गक्रमणाची रचना करण्यात आली होती. डोक्यावर मी लिंगायत लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि हाती जय लिंगायत लिहिलेले पांढरे झेंडे घेतलेले मोर्चेकरी लक्षवेधी ठरले. वाहतूकीला अडथळा होऊ नये म्हणून तीन-तीन जणांच्या रांगा होत्या. हा मोर्चा समता मैदानात परतला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांनी हजेरी लावली. हंसिका तोडकरी हिने मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोक मेनकुदळे, अ‍ॅड. अविनाश भोसीकर, नीलेश शेटे, मंगेश शेटे, धर्मेंद्र पुजारी, आनंद कर्णे, राजेश विभुते, डॉ. जयेश हातगावकर, कल्पना देशमुख, अर्चना जवसकर, दीपक धारणे, बबन झाडे, शुभांगी हातगावकर आदींची महामोर्चात उपस्थिती होती.प्रेतसंस्कार विधीसाठी दहा एकर जागा द्यावैशिष्ट्यपूर्ण प्रेतसंस्कार विधीसाठी यवतमाळ येथे दहा एकर जागा द्यावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे, डॉ. किशोर मांडगावकर, संजय तोडकरी, गिरीश गाढवे, सदानंद बिच्चेवार, अभिजित हातगावकर, अशोक मुक्तापुरे, पद्मश्री हातगावकर, शिल्पा बेगडे, सीमा केळकर यांचा समावेश होता.