शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

हलकं-फुलकं नाटक : ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’

By admin | Updated: July 29, 2015 02:39 IST

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी हा तसा पुरातन विषय. साहित्याचा बहुतांश भाग प्रेम आणि प्रेमासाठी सर्व काही या विषयानेच व्यापलेला दिसतो.

काशिनाथ लाहोरे  यवतमाळ प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी हा तसा पुरातन विषय. साहित्याचा बहुतांश भाग प्रेम आणि प्रेमासाठी सर्व काही या विषयानेच व्यापलेला दिसतो. कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपटात प्रेमाशिवाय काहीच दिसत नाही. त्यातही प्रेमविवाह असेल तर प्रारंभीचे गुलाबी दिवस संपल्यावर भांडणाशिवाय संसारात काहीच शिल्लक राहात नाही. अ‍ॅड. नानासाहेब इनामदार हे नावापुरतेच वकील. प्रेमाशी प्रेमविवाह करून घरजावयासारखे निष्क्रिय गृहस्थ. बायकोच्या कह्यात पूर्णपणे गेलेले. नवऱ्यासारखा नालायक माणूस दुसरा नाही, अशी समजूत झालेली प्रेमा. त्याला सतत धारेवर धरते. फुलदानी फुटली तरी फोडून काढीन, अशी धमकी देते. यांचे एकुलते एक अपत्य म्हणजे आदित्य. मैत्रीण सोनालीशी प्रेम करण्याशिवाय याचाही दुसरा उद्योग नाही. फुकटात पेपर वाचून चहा उकळणारा आणि प्रेमाशी जवळीक साधू पाहणारा शेजारी बाटलीवाला. २० वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेला नानासाहेबांचा भाऊ दादासाहेब. चित्रपटात नेहमीच हास्यविषय झालेली व्यक्ती म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. त्यांची मोलकरीण कमला. प्रेमाचा बालमित्र रमेश गोडबोले, दादासाहेबांची तथाकथित पत्नी रोझा आणि वेड्याच्या दवाखान्यातून पळालेला आणि स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा मनोरुग्ण. अशी एकापेक्षा एक भन्नाट पात्र असलेले भन्नाट विनोदी नाटक म्हणजे ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’. फुलदानी फुटल्याचे निमित्त होते. बायकोपासून वाचण्यासाठी नानासाहेब मुलाच्या सल्ल्याने घर सोडून निघून जातात. २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या दादासाहेबांच्या रुपात पुन्हा घरी येतात. आणि नंतरचा गोंधळ म्हणजे हे नाटक. नवऱ्यची खोड मोडण्यासाठी बायको प्रेमाने रचलेले नाटक त्यावर कडी करणारे ठरते. शेवटी गैरसमज दूर होऊन पुन्हा एकमेकांना भांडायला मोकळे असे अत्यंत ठिसूळ कथानक असलेले हे नाटक आहे. तीन अनुभवी कलावंत वगळले तर बाकीचे सर्व कलावंत नवीन असल्याचे वारंवार जाणवत होते. सदोष ध्वनिव्यवस्था, कमकुवत प्रकाश योजना आणि संगीत, यथातथाच नेपथ्य इत्यादी कारणांमुळे ज्या उंचीवर नाटक जायला हवे होते, ती उंची त्याला गाठता आली नाही. त्यात भर पडली ती घामाच्या धारांची, नाट्यगृहाच्या दुरुस्तीची आणि ऐनवेळी बदललेल्या पात्राची.विकास विसपुते लिखित, अपूर्वा सोनार निर्मित आणि दिग्दर्शित या दोन अंकी नाटकात प्रा. अजय कोलारकर, अविनाश मानेकर, मेघा भास्करवार, स्नेहा पारोदे, ऋषिकेश व्यास, स्वप्नील घोडे, पूजा खंडारे, श्रद्धा कोलारकर, अनिकेत मुडे अपूर्वा सोनार यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रकाशयोजना अशोक कार्लेकर यांची तर पवन भारस्कर यांनी संगीत दिले आहे. शनिवारी २५ जुलैला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात पार पडलेल्या या नाटकासाठी रसिकवर्ग मात्र मोठ्या संख्येने हजर होता. तेजांकूर संस्था व जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका निराधार महिलेच्या मदतीकरिता हा नाट्यप्रयोग झाला.