सागरा प्राण तळमळला... : सूर्याच्या प्रकोपाने सध्या जलाशयांचे पात्र रिकामे केले आहे. यवतमाळनजीकच्या जामवाडी तलावाचे पाणी आक्रसून गेले आहे. उर्वरित पात्रात पाणी नसले तरी पाण्याच्या संगतीमुळे थोडीशी हिरवळ तग धरून आहे. परिसरात कुठेच चारा सापडत नाही म्हटल्यावर गुरांचा कळप आता तलावाच्या कोरड्या पात्रात तोंड गोड करतोय. जनावरांप्रमाणेच माणसांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहे. सर्वांनाच मृगाची आस लागली आहे.
सागरा प्राण तळमळला... :
By admin | Updated: May 17, 2017 00:52 IST