शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या खुनात जन्मठेप

By admin | Updated: January 27, 2015 23:40 IST

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न देणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचे सिध्द झाल्याने पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डोरले यांनी वणी तालुक्याच्या मूर्ती येथील प्रकाश गजानन गोहोकार

निकाल : टॉवेलच्या साहाय्याने आरोपीचा मागपांढरकवडा : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न देणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचे सिध्द झाल्याने पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डोरले यांनी वणी तालुक्याच्या मूर्ती येथील प्रकाश गजानन गोहोकार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना साडेतीन वर्षांपूर्वी घडली होती. २४ आॅक्टोबर २0११ रोजी प्रकाश गोहोकार याने ग्राम मूर्ती येथील विवाहिता संगिता विलास बोंडे हिची हत्या केली होती. त्याची संगितावर वाईट नजर होती. तिची तो छेडखानी करीत होता. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. तरीही प्रकाशने तिचा पिच्छा सोडला नाही. २४ आॅक्टोबर २०११ रोजी सकाळी ११.३0 वाजता संगीता कापूस वेचण्याकरिता पांदण रस्त्याने शेतात जात असताना प्रकाशने वाटेत तिला अडविले. त्याने पुन्हा आपल्या प्रेमाची तिच्याकडे वाच्यता केली. मात्र त्याच्या या एकतर्फी प्रेमाला संगीताने स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे चिडून जाऊन प्रकाशने संगिताच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी मृतकचा पती विलास बोंडे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या घटनेतील आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र घटनास्थळी आढळलेल्या एका टॉवेलवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. महिनाभरानंतर आदिलाबाद रेल्वेस्थानकावरून प्रकाशला अटक करण्यात आली. न्या. डोरले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले.त्यातील काही साक्षदार आता मृत्यू पावले आहेत. न्या. डोरले यांनी आरोपी प्रकाशला भादंवि कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला दोन हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास सुनावला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.प्र.अ.मानकर यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)