शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

खुनात पिता-पुत्रांसह चौघांना जन्मठेप

By admin | Updated: September 30, 2014 23:41 IST

पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती.

दारव्हा : पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती. सतीश रमेश शेळके (२६), रमेश शेळके (५२), संतोष रमेश शेळके (२९) आणि दीपक ठाकरे सर्व रा.टिळकवाडी परिसर दारव्हा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे तर नरेश मधुकर शिंदे (३५) रा.टिळकवाडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. नरेश शिंदे आणि या प्रकरणातील आरोपी घटनेच्या एक वर्ष आधी घाटंजी येथील जिनिंगवर कामाला होते. तेथून दारव्हा येथे परत आल्यावर एकाच परिसरात राहात होते. शेळके आणि शिंदे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादात नरेशने सतीश शेळके याच्यावर चाकूने हल्ला केला आणि पसार झाला. यातून आरोपींच्या मनात नरेशबद्दल राग खदखदत होता. घटनेच्या दिवशी नरेश घरी आल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यामुळे या चौघांनीही नरेशच्या घरात शिरून त्याला मारहाण केली. यात नरेशच्या पोटावर चाकूचे वार केले. त्यात नरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात आठ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकारी वकील अविनाश शेटे यांनी युक्तिवाद केला. खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने चौघांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (शहर प्रतिनिधी)