शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अजय बन्सोड खूनप्रकरणी ‘बल्ली’ला जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: August 4, 2016 00:54 IST

येथील पाटीपुरा परिसरातील महात्मा फुले चौकात २० मे २०१४ रोजी जुन्या वादातून सात-आठ जणांनी मिळून अजय भीमराव बन्सोड (२३) या युवकाचा

तीन साक्षीदार फितूर : पाच आरोपी निर्दोष, दोघे अद्यापही फरार यवतमाळ : येथील पाटीपुरा परिसरातील महात्मा फुले चौकात २० मे २०१४ रोजी जुन्या वादातून सात-आठ जणांनी मिळून अजय भीमराव बन्सोड (२३) या युवकाचा चाकुने हल्ला करून खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी रितेश उर्फ बल्ली विलास बाविस्कर (२२) रा. अशोकनगर पाटीपुरा याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविली तर इतर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी मृतक अजय बन्सोडची पत्नी ज्योती अजय बन्सोड रा. कपिलवस्तू नगर हिने शहर पोलिसात तक्रार दिली होती. अजय बन्सोेड याची दुचाकी अडवून वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला करून ठार करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रितेश उर्फ बल्ली विलास बाविस्कर (२२) रा. अशोकनगर, पाटीपुरा, सचिन सुरेश डोंगरे (२६), अनिकेत दिनेश वासनिक (२१), राजेश राहुल जंगले (२६), विरेन्द्र उर्फ विऱ्या अशोक कोल्हे (२५) व विजय भीमराव धुळे (२८) रा. सर्व पाटीपुरा यवतमाळ यांना अटक केली होती. या प्रकरणातीलच नितीन भीमराव धुळे (२५) व अनिल भीमराव गजभिये (३२) हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सदर प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर सहा जणांविरुद्ध खटला चालविण्यात आला. एकूण १४ साक्षिदार तपासले. उल्लेखनिय म्हणजे यातील मुख्य तीन प्रत्यक्षदर्शी साक्षिदार फितूर झाले. तरीसुद्धा मृतकची पत्नी ज्योती हिचे बयान, वैद्यकीय अहवाल व प्रत्यक्षदर्शी पुरावा आदींना ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव यांनी रितेश बाविस्कर याला जन्मेठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास ठोठाविला. इतर पाच आरोपींची मात्र सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र बी. मेश्राम यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी) मुलगा व पत्नीला पाच लाख मिळणार मृतक अजय बन्सोडची पत्नी ज्योती व मुलगा यांच्या उदरनिर्वाहाचा सध्या मोठा प्रश्न आहे. हे दोघेही उघड्यावर आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तजविज असावी, ही बाब अ‍ॅड. नरेंद्र मेश्राम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने मृतकाची पत्नी ज्योती हिला तीन लाख रुपये व मुलाला दोन लाख रुपये मंजूर केले. ही बाब या खटल्यातील वैशिष्ट ठरले.