शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लेवा येथे आरोग्य पथक तळ ठोकून

By admin | Updated: November 1, 2014 23:15 IST

तालुक्यातील लेवा येथे डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरू आहे. घराघरात रुग्ण दिसत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या तीन दिवसांपासून

महागाव : तालुक्यातील लेवा येथे डेंग्यूसदृश आजाराचे थैमान सुरू आहे. घराघरात रुग्ण दिसत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. गेल्या तीन दिवसांपासून पथक येथे तळ ठाकून असून रुग्णांचे रक्त नमुने घेतले जात आहे. दरम्यान, गावात फवारणीसाठी आणलेल्या दोन्ही फॉगिंग मशीन सुरूच झाल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच आता स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेतली आहे. महागाव तालुक्यातील लेवा येथे गेल्या १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. घराघरात रुग्ण असून काही जणांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार दिली होती. परंतु कुणीही दखल घेतली नाही. त्यानंतर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या तीन दिवसांपासून तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.सी. टारफे येथे तळ ठोकून आहेत. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदडे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्यावतीने रुग्णांचे रक्त नमुने घेतले जात आहे. दोन दिवसात ४० रुग्णांचे नमुने घेण्यात आले. अहवाल आल्यानंतर नेमका आजार कळणार आहे. तसेच हिवताप निर्मूलन विभागाचे कर्मचारी आर.आर. आकडे, वसंत लांडे हे गावात दाखल झाले आहे.दरम्यान, आरोग्य पथक गावात असतानाही रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. केतकी प्रदीप देशमुख (१४) या बालिकेला नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डासांच्या निर्मूलनासाठी गावात फॉगिंग मशीन आणण्यात आले. मात्र मशीन सुरूच झाले नाही. त्यानंतर दुसरे मशीन आणले. तेही सुरू झाले नाही. त्यामुळे आता गावकरीच स्वयंस्फूर्तीने नाल्या व गटारांची साफसफाई करीत आहे. आरोग्य यंत्रणेबद्दल गावकऱ्यांत प्रचंड रोष असून सुरुवातीला माहिती दिल्यानंतर आरोग्य पथक आले असते तर अशी स्थिती निर्माण झाली नसती, असा आरोप आता गावकरी करीत आहे. गावात स्वच्छता अभियानासाठी किशोर खंदारे, किशोर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवराव खंदारे, अनिल देशमुख, दत्ता फाळके, भाऊसाहेब देशमुख आदींच्या पुढाकारात गावकरी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)