शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

जिल्हा परिषदेत आढळले ७३ कर्मचारी लेटलतिफ

By admin | Updated: December 8, 2014 22:39 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांनी १०.१५ वाजता अचानक जिल्हा परिषदेची झाडाझडती घेतली. तेव्हा एक-दोन नव्हे तर तब्बल ७३ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ही अवस्था असेल

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांनी १०.१५ वाजता अचानक जिल्हा परिषदेची झाडाझडती घेतली. तेव्हा एक-दोन नव्हे तर तब्बल ७३ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ही अवस्था असेल तर इतर दिवसांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या लेटलतिफांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी दिले आहे. कर्मचारी जागेवर मिळत नाही ही नेहमीचीच तक्रार आहे. येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने प्रत्येकांची काम करण्याची पद्धत मनमर्जीने सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी स्वत:च आढावा घेणे सुरू केले आहे. त्यांनी सोमवारी सकाळी वित्त विभागापासून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. यात वित्त विभागातील १७ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागात ९, पंचायत विभागात दहा, शिक्षण विभागात १३, पाणी पुरवठा विभागात पाच, बांधकाम विभागात ११ आणि सिंचन विभागात आठ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन का कापण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावल्या जावी, शिवाय या पुढे नियमित वेळेवर कार्यालयात उपस्थित राहील, अशी हमीही त्यांच्याकडून घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष डॉ. फुफाटे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांना दिल्या आहे. अध्यक्षांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे कर्मचारी वर्गात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना तंबी देऊन सोडण्यात आले होते. मात्र त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. या पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. आरती फुफाटे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)