शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

ग्रंथपालासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून

यवतमाळ : आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यासह त्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी आर्णी येथे करण्यात आली. शासकीय योजनेतून वितरित करण्यात आलेल्या साहित्याच्या मंजुरीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद वासुदेवराव रामशेट्टीवार यांनी ३०० रुपयाच्या लाचेची मागणी केली. यासाठी त्यांनी किशोर सीताराम राठोड या खासगी व्यक्तीची मदत घेतली. ग्रंथपाल अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार सामकी माता सार्वजनिक ग्रंथालय आर्णी यांच्याकडून करण्यात आली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमोल महल्ले, नीलेश पखाले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांंनी सापळा रचला. यात किशोर राठोड हा ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. या प्रकरणात प्रमोद रामशेट्टीवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)