शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बंद

By admin | Updated: September 4, 2016 00:45 IST

एकीकडे एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षक संघटना प्रशासनाशी संघर्ष करीत असतानाच जिल्हा परिषद सीईओंनी शनिवारी या शिक्षकांना मोठा दणका दिला आहे.

सीईओंचा दणका : पांढरकवडा, घाटंजी, मारेगावसह पाच पंचायत समितींना आदेशअविनाश साबापुरे  यवतमाळएकीकडे एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षक संघटना प्रशासनाशी संघर्ष करीत असतानाच जिल्हा परिषद सीईओंनी शनिवारी या शिक्षकांना मोठा दणका दिला आहे. कोणत्याही शिक्षकाला एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येवू नये, असे सीईओंचे आदेश पाच पंचायत समितींमध्ये धडकताच शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. जिल्ह्यातील पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव, झरीजामणी, आर्णी या पाच तालुक्यातील कार्यरत शिक्षकांना आदिवासी-नक्षलग्रस्त भागात काम करीत असल्याबद्दल विशेष भत्ता दिला जातो. पाचही पंचायत समिती मिळून साधारणता तीन हजार शिक्षकांना या एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. मात्र २००९ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली जात नाही. त्यामुळे त्यांनाही एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे रेटून धरली आहे. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शनही मागविले होते. दरम्यान, २४ आॅगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांनी शासन निर्णयाचा हवाला देत संबंधित पंचायत समित्यांना पत्र पाठवून सर्वच शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बंद करण्याचे आदेश दिले आहे. हे पत्र शनिवारी ३ सप्टेंबरला संबंधित पंचायत समितीमध्ये धडकताच शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत चालू ठेवावी, अशी मागणी इब्टाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत यांनी केली आहे. पगारात तीन हजारांची कपात साधारणत: तीन हजार शिक्षक सध्या एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ घेत आहे. सीईओंनी ही वेतनश्रेणी बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे त्यांच्या पगारात तीन ते चार हजार रुपयांची कपात होणार आहे. एकीकडे संघटना एकस्तरची मागणी करीत आहे. तर सीईओंच्या भूमिकेनुसार हा विषय मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील बाब आहे. त्यामुळे संघटना विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.