शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंना डावलून ‘डीएचओं’चा थेट मंत्रालयाशी पत्रव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:34 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती महिनाभरापूर्वी ग्रामविकास विभागाने मागविली होती. त्यासाठी सीईओंनी डीएचओंना आदेशही दिला. मात्र, महिनाभर या आदेशाची दखलही न घेणाऱ्या डीएचओंनी आता थेट मंत्रालयालाच माहिती पाठवून दिली. जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख असलेल्या सीईओंना मात्र याची साधी खबरबातही लागू दिलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ग्रामविकासच्या पत्राला महिनाभराने उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती महिनाभरापूर्वी ग्रामविकास विभागाने मागविली होती. त्यासाठी सीईओंनी डीएचओंना आदेशही दिला. मात्र, महिनाभर या आदेशाची दखलही न घेणाऱ्या डीएचओंनी आता थेट मंत्रालयालाच माहिती पाठवून दिली. जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख असलेल्या सीईओंना मात्र याची साधी खबरबातही लागू दिलेली नाही.आरोग्य विभागाच्या कामाची गती अतिशय संथ आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तर बसतोच; पण मंत्रालयीलन पत्रव्यवहारालाही बसत आहे. मे महिन्यात मागविलेला अहवाल चक्क जूनच्या शेवटी पाठविण्याचा प्रताप जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाºया आरोग्य विभागाची स्थिती नेमकी कशी आहे, याची प्रचिती येते.ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १५ मे रोजी आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाºयांची माहिती मागविली. याबाबत जिल्हा परिषदेकडून डीएचओ कार्यालयला निर्देश देण्यात आले. २२ मेपर्यंतच ही माहिती पाठविण्याची मुदत होती. आरोग्य विभागाने या पत्राची दखलच घेतली नाही. अखेर प्रकरण अंगाशी येणार असे दिसताच चक्क २८ जून रोजी परस्पर कंत्राटी कर्मचाºयांचा अहवाल ग्रामविकास विभागाकडे पाठविला.ही माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडूनच जाणे अपेक्षित होते. मात्र आपला ‘लेटलतिफ’ कारभार उघड होईल, या भीतीने आरोग्य विभागाने परस्परच माहिती ग्रामविकास मंत्रालयातील कक्षाधिकाºयांकडे पाठविली आहे. या गंभीर बाबीकडे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.ही माहिती नेहमीच संकलित केली जाते. येथे एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी आहे. ग्रामविकास विभागाचा एकही कंत्राटी कर्मचारी येथे कार्यरत नाही. तीच माहिती पाठविण्यात आली आहे.- डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ