शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

चलो किसी बच्चे को हसाया जाएं..!

By admin | Updated: August 30, 2015 02:11 IST

वाट्टेल ती किंमत मोजून ‘एन्जॉय’ करण्याची जणू सध्या पैजच लागली आहे. पण ओरबाडल्याने सुख मिळते का?

दातृत्वाचा सोहळा : मतिमंद मुलांना अशीही सप्रेम भेटलोकमत प्रेरणावाटयवतमाळ : वाट्टेल ती किंमत मोजून ‘एन्जॉय’ करण्याची जणू सध्या पैजच लागली आहे. पण ओरबाडल्याने सुख मिळते का? उलट आपल्याकडे जे काही आहे, ते गरजूंना वाटून दिले की, हवा तेवढा आनंद आपल्या पदरात आपसूकच येऊन पडतो. गणेश दाढे नावाच्या गृहस्थाने तेच केले. आपला मुलगा कायमचा हरपल्याची बोच काळजात लपवून त्यांनी इतर गरजू मुलांना सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणूनच एक मुलगा गमावल्यानंतरही त्यांच्या भोवती मुलांचा मोहक विळखा कायम राहिला!बाप-लेकाच्या नात्यातला जिव्हाळा अधिक दृढ करणारा हा प्रसंग विशालनगरातील मतिमंदांच्या निवासी शाळेत शुक्रवारी घडला. मुलगा रुपेश याचे निधन झाल्यानंतर गणेश दाढे अगदीच एकाकी पडले. वर्षभरापूर्वीच मुलगा गेला, हे दु:ख कोणता पिता इतक्या सहज विसरणार? गणेश दाढे यांच्या काळजालाही ही सल सतत टोचतच होती. पण केवळ मुलासाठी कुढत बसण्यापेक्षा समाजातील इतर मुलांना हसविण्याचा प्रयत्न केला तर..!घर से मस्जीद है बहोत दूरकिसी रोते हुए बच्चे को हसाया जाएंगणेश दाढेंनीही हाच विचार केला. त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि ते कामाला लागले. मुलाच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मतिमंद मुलांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा तो विचार होता. जीवन विकास मंदिर ही मतिमंद मुलांची निवासी शाळा त्यांनी गाठली. या मुलांच्या सोयीसाठी त्यांनी तब्बल २४ लोखंडी कॉट सप्रेम भेट दिल्या. मतिमंद मुलांना स्वत:हून हालचाल करणे कठीण जाते. अशा वेळी त्यांना जमिनीवरून वर उचलण्यासाठी या कॉट मोठ्या उपयोगी ठरतात. चांगले काम घडले, त्यातून आणखी काही तरी चांगले घडतेच. गणेश दाढे यांच्या दातृत्वाचा प्रसंग पाहणाऱ्या डॉ. संदीप धवने यांनीही मतिमंदांना काही तरी देण्याचे ठरवले. त्यांनी मग या निवासी शाळेला एक्झॉस्ट पंखे दिले. निवासी शाळेत सतत खेळती हवा राहण्यासाठी या पंख्यांची मदत होणार आहे. जीवनात येणे आणि जाणे कुणाला चुकले? पण जीवनात इतरांसाठी फुल ना फुलाची पाकळी तरी आपण देऊ शकलो, हे समाधान अनेकांचे आयुष्य वाढवित असते. त्यातून घेणाऱ्याला मिळणाऱ्या सुखापेक्षाही देणाऱ्याला मिळणारा आनंद अमूल्य असतो. मतिमंदांना मदत करणाऱ्या दाढे आणि धवने या गृहस्थांच्या वाट्याला असाच आनंद आलाय... (स्थानिक प्रतिनिधी)