शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

विद्यार्थिनीने शिकविला चिडीमाराला धडा

By admin | Updated: August 5, 2015 00:19 IST

शहरातील शिवनेरी चौकात चिडीमारीचा प्रकार वाढल्याने विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक त्रस्त आहे.

आर्णीतील घटना : टवाळखोर तरुण दुचाकी सोडून पळालाआर्णी : शहरातील शिवनेरी चौकात चिडीमारीचा प्रकार वाढल्याने विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक त्रस्त आहे. सोमवारी मात्र एका शाळकरी विद्यार्थिनीने टवाळखोर तरुणाला चांगलाच धडा शिकविला. शेवटी या तरुणाला आपली दुचाकी सोडून पळ काढावा लागला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही शाळकरी मुलगी कॉम्प्युटर क्लास करून घरी परत निघाली होती. एका टवाळखोर तरुणाने तिला भररस्त्यात अडविले. तिने मोठ्या हिमतीने या तरुणाला आपण रस्त्यावर बोलण्यापेक्षा घरी बसून निवांत बोलू, असे सांगितले. तरुणाला लगेच पुढे काही तरी गंभीर होणार, याची जाणिव झाली व तो तुला पाहून घेतो म्हणत दुचाकीने निघून गेला. मुलीने लगेच वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलगी व तिचे वडील त्या तरुणाचा शोध घेत शिवनेरी चौकात आले. तो तरुण उभाच होता. मात्र मुलीने आपल्या वडिलांना आणल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता तो टवाळखोर तरुण दुचाकी जागीच सोडून पळून गेला. या घटनेमुळे आजूबाजूला उभे असलेले टवाळखोर तरुणही पळाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर टवाळखोराची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. मुलीने रितसर तक्रार दाखल केली. मात्र टवाळखोर तरुण आपल्या आई-वडिलांना घेऊन मुलीच्या घरी पोहोचला व तक्रार देऊ नका, अशी गयावया केली. पण मुलीने आपली तक्रार कायम ठेवली. चिडीमारीच्या त्रासामुळे अनेक तरुणींचे शिक्षणाकडेही दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. म्हणूनच पालकही चिंतेत पडले आहेत. मात्र, चिडीमारीचा त्रास सहन करणाऱ्या अनेक तरुणी व त्यांचे पालक बऱ्याचदा पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यास कचरतात. त्यांना बदनामीची भीती वाटते. मात्र, चिडीमार तरुणाला धडा शिकविणाऱ्या तरुणीप्रमाणे सर्वांनी हिंमत दाखवायला हवी. शहरात कुठेही चिडीमारी आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असे आवाहन ठाणेदार संजय खंदाडे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)