शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

सबलीकरण मेळाव्याला पाठ

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

येथील पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी सशक्तीकरण अभियानातर्गंत ‘पंचायत सबलीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात तालुक्यातील सरपंच व सचिवांना मार्गदर्शन

सरपंच व सचिवांना मार्गदर्शन : पदाधिकाऱ्यांच्या सशक्तीकरणावर जोरकळंब : येथील पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी सशक्तीकरण अभियानातर्गंत ‘पंचायत सबलीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात तालुक्यातील सरपंच व सचिवांना मार्गदर्शन करण्यात आले. परंतु या मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनीच पाठ दाखविल्याने उपस्थितांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे सशक्तीकरण करणे हा मेळावा घेण्यामागील मुख्य उद्देश होता. परंतु ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हीसुद्धा फारसी नव्हती. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी (पंचायत) श्रीराम बाहेकर, गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, रमेश केळकर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश साव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार, कर वसुली वाढविणे, पाणीपुरवठा व पाणी शुध्दीकरण, यशवंत पंचायतराज योजना, निर्मल भारत योजना, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, अंदाजपत्रकातील निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे आदी विषयांची माहिती सरपंच व सचिवांना देण्यात आली. या योजनांचा ग्रामीण भागात अतिशय उपयोग होणार आहे. योग्यरित्या या योजनांची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भाग सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच सदर योजनांसदंर्भात सर्व बारिक-सारिक माहिती पदाधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे. या मेळाव्यात तज्ज्ञांनी अतिशय मुद्देसूद माहिती याविषयावर उपस्थित लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना दिली. म्हणूनच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मेळाव्याला बहुतांश पदाधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ग्रामिण भागातील योजनांसंदर्भात हे पदाधिकारी किती गंभीर आहे, हेच यातून दिसून आले. मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कळंब तालुक्यात तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती सदस्य आहे. परंतु पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी सोडल्या तर इतर सर्व सदस्यांनी पंचायत सबलीकरण मेळाव्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख हे सुध्दा याच तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतात. तरीसुद्धा ते किंवा त्यांचा कुणीही प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित नव्हते. (तालुका प्रतिनिधी)