शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ससाणीत लेकी-जावयांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:13 IST

पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले.

ठळक मुद्देदुष्काळाचा पुतळा दहन : अधिक मासात जावयाकडूनच श्रमदानाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले. २२ मे रोजी रात्री बारा वाजता दुष्काळाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे महिलांनी दहन केले. सासुरवासीनी झालेल्या गावच्या लेकी जावयांनाही श्रमदानासाठी बोलवण्यात आले. अधिक मासात श्रमदान करून अनोखा पायंडा येथील जावयाने घातला आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पन्नास जोडप्यांना एकाच व्यासपिठावर गावाच्यावतीने पाय धुवून अहेर आणि धोंडफळाची अनोखी सामूहिकपणे भेट देण्यात आली. दुसऱ्याची लेक ही माझ्या लेकीप्रमाणे आहे. आपण सर्वांनी या पवित्र नात्याला जपले पाहिजे हा मूल्यसंवर्धनाचा संदेश ससाणी वासियांनी दिला. या प्रसंगी लेकी आणि जावयांचे मनोगत घेण्यात आले. गावाच्यावतीने मु.अ.पुसनाके, शिक्षक राजेंद्र गोबाडे, कृषीसहाय्यक कुंचटवार यांचा सपत्निक आणि ग्रामसेवक जंगमवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वॉटर हिरो विशाल आडे, बंधन सोनडवले, आशिष भगत, दिलीप नगराळे, सौ. रंजना कातकडे, शितल बागेश्वर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिल्लीवरून व्हिडिओकॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. राजू तोडसाम, तहसिलदार जी.के. हामंद, जि.प. सदस्य आशिष लोणकर, गटविकास अधिकारी आरेवार, वाडगे, विकासगंगा संस्थेचे आणि एफ.ई.एस.चे अधिकारी, कार्यकर्ता गुड्डू शुक्ला, आकाश जाधव, पिंटू उगले, नामपेल्लीवार, मंगळे उपस्थित होते.आज सामाजातील लोप पावत चाललेला एकोपा ,सामाजिक सौदार्य टिकवून वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे.असा मोलाचा संदेश ससाणीवासियांनी दिला. लेकी व जावयांनी दुष्काळ निवारणासाठी पाणी फाऊंडेशनच्या अभियानात उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. या कामात त्यांनीही खारीचा वाटा उचलला.