दोनच सदस्य : नगरसेविकांनी मांडल्या समस्यायवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळ सचिवालय महिला हक्क व कल्याण समितीचा यवतमाळ दौरा केवळ सोपस्कार ठरला. या समितीतील १५ सदस्यांपैकी दोनच सदस्य या बुधवारी यवतमाळ दौऱ्यात आले होते. नगर परिषदेत महिला नगरसेविकांनी विविध समस्या समितीपुढे मांडल्या. तर जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षांसह केवळ सात जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होत्या.स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के प्रतिनिधीत्व मिळालेल्या महिलांचे हक्क अबाधित आहेत काय, त्यांच्या अडचणी काय यासाठी बुधवारी विधिमंडळ सचिवालय हक्क व कल्याण समिती यवतमाळात दाखल झाली. या समितीच्या १५ सदस्यांपैकी आमदार मनीषा चौधरी आणि आमदार भारती लव्हेकर या दोन सदस्य दौऱ्यात आले. सकाळी या समितीने विश्रामगृहावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर थेट यवतमाळ नगर परिषदेला भेट दिली. या बैठकीत माजी बांधकाम सभापती असलेल्या नगरसेविकेने गंभीर स्वरुपाचे मुद्दे समितीसमोर मांडले. शहरातील स्वच्छतेच्या कंत्राटामध्ये नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, त्यामुळे वित्त आयोगातून मिळणारी बहुतांश रक्कम या कामावरच खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (कार्यालय प्रतिनिधी)
विधिमंडळ महिला समितीचा दौरा केवळ सोपस्कार
By admin | Updated: August 21, 2015 02:51 IST