शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

विधानपरिषद लढायचीच !

By admin | Updated: October 14, 2016 02:58 IST

जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे.

एकमुखी ठराव : काँग्रेसच्या बैठकीत मांडले विजयाचे गणितयवतमाळ : जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसनेच विधानपरिषदेची निवडणूक लढावी, असा एकमुखी ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतींची बैठक झाली. काँग्रेसकडे विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणे चुकीचे आहे. विधानपरिषदेच्या जागा वाटपात यवतमाळची जागा काँग्रेसलाच मागावी, अशी आग्रही भूमिका नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी या बैठकीत मांडली. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपसभापती वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, निरीक्षक श्याम उमाळकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थित सर्वच सदस्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी सदस्यांच्यावतीने आर्णीचे नगराध्यक्ष आरिज बेग यांनी ठराव मांडला. याला उपस्थित सदस्य व नेते मंडळींनी सहमती दर्शविली. जिल्ह्यातून कोणत्याही परिस्थितीत शिवीगाळीची भाषा हद्दपार झाली पाहिजे. विधानपरिषदेसाठी नेत्यांनीसुद्धा एकत्र यावे, अशी विनंती सदस्यांनी केली. आज काँग्रेसकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत १५४ सदस्य आहेत आणि महागावच्या नऊ सदस्यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील यवतमाळची जागा काँग्रेसनेच कोणत्याही परिस्थितीत लढवावी, असा निर्णय घेण्यात आला. आघाडीत जागेच्या वाटाघाटीत यवतमाळची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतरही काँग्रेसने येथे उमेदवार द्यावा, असाही ठराव या बैठकीत घेण्यात आला. याला नेते मंडळींनी तत्त्वत: मान्यता दिली. उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये जीवन पाटील, शंकर बडे, नरेंद्र ठाकरे, इस्राईल शेठ, डॉ. वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखे, योगेश पारवेकर यांचा समावेश आहे. यापैकी एकाचे नाव निश्चित करून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी मागण्यात येईल, असे माणिकराव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके आणि पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर यांच्या समितीने हे नाव निश्चित करून प्रदेशकडे पाठवावे, अशी सूचना माणिकराव ठाकरे यांनी केली. विधानपरिषदेसंदर्भात १५ आॅक्टोबरला मुंबईत प्रदेश काँगे्रसने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत यवतमाळच्या जागेबाबत भूमिका मांडणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, माजी आमदार नंदिनी पारवेकर, माजी आमदार विजयाताई धोटे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुनील भेले, प्रफुल्ल मानकर, अरुण राऊत आदींसह काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती. (कार्यालय प्रतिनिधी)