शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत विधी सल्ल्यासाठी ‘लिगल हेड क्लिनिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:10 IST

न्यायालयीन प्रकरणात मोफत सल्ला व विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘लिगल हेड क्लिनिक’ स्थापन केले.

पत्रपरिषद : विधी सेवा प्राधिकरण सचिवांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : न्यायालयीन प्रकरणात मोफत सल्ला व विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘लिगल हेड क्लिनिक’ स्थापन केले. त्याव्दारे कोणत्याही व्यक्ती, आरोपीला मोफत सल्ला दिला जाईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अरविंद भंडारवार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले. गरीब व गरजू नागरिकांना विधी सहाय्य देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून ठोस कार्यक्रम राबविले जात आहे. अद्याप अनेकांना प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या सेवांची पुरेशी माहिती नाही. तालुका आणि यवतमाळ मुख्यालयात लिगल हेड क्लिनिकच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात आहे. विधी सहाय्य मिळविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालीलच व्यक्ती पात्र ठरते, असा गैरसमज आहे. आता शासनाने विधी सहाय्यासाठी उत्पन्न मर्यादेची अट दोन लाखांपर्यंत वाढविली. याशिवाय कोणत्याही व्यक्तीला विधी विषयक मोफत सल्ला दिला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात पूर्णवेळ वकील उपलब्ध असतात. जिल्हा मध्यवर्ती कारागृह, राणा प्रतापनगरमधील ज्येष्ठ नागरी भवन येथे रविवारी सकाळी ११ ते २ आणि बुधवारी सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत मोफत सल्ला व सहाय्य दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीतही लिगल हेड क्लिनिक स्थापन केले जाणार आहे. यासाठी पॅरालिगल व्हॅलेन्टीअर नियुक्त केले असून त्यात ज्येष्ठ नागरिक, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश राहील. विधी स्वयंसेवक म्हणून कार्यरत व निवृत्त शिक्षक, निवृत्त शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या सेवाभावी अशासकीय संस्था व क्लबचे सदस्य, महिलांचे संघ, दीर्घकाळ तुरुंगात असलेले शिक्षित कैदी याशिवाय जिल्हा अथवा तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती कार्य करू शकते, असेही त्यांनी सांगितले.