शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीकडूनच मिळतील एलईडी बल्ब

By admin | Updated: October 17, 2015 00:33 IST

ग्राहकांना विजेचे बील कमी यावे, या हेतुने वीज कंपनीने पर्यावरणपूरक आणि स्वस्त असे एलईडी बल्ब वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

रविवारपासून वितरण सुरू : घरगुती विद्युत ग्राहकांनाच मिळेल लाभयवतमाळ : ग्राहकांना विजेचे बील कमी यावे, या हेतुने वीज कंपनीने पर्यावरणपूरक आणि स्वस्त असे एलईडी बल्ब वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यवतमाळ येथे रविवार, १८ आॅक्टोबरपासून या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील सरसकटक घरगुती विद्युत ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार या योजनेत सहभागी होऊन बल्ब घेऊ इच्छिणारा ग्राहक हा घरगुतीच असावा, व्यावसायिक वापरासाठी हे बल्ब मिळणार नाहीत. चालू महिन्याचे विजेचे बिल भरलेले असावे, विजेचे बिल थकित असणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका बिलावर जास्तीत जास्त चार एलईडी बल्ब (सात वॅटचे) मिळतील, त्यासाठी प्रती बल्ब शंभर रूपये किंमत असेल. ज्यांना एकाच वेळी शंभर रुपये देणे शक्य नसेल त्यांना प्रत्येक बल्बसाठी सुरूवातीला केवळ १० रुपये म्हणजे चार बल्ब घ्यावयाचे असल्यास ४० रुपये रोख भरावे लागेल. त्यानंतर उर्वरित रक्कम महिनेवारी पद्धतीने (ईएमआय) वीज बिलात लागून येईल. महावितरणने हा बल्ब वितरण उपक्रम राबविण्यासाठी खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात बल्ब वितरित करीत आहे. बाजारभावापेक्षा अतिशय कमी किमतीत हे बल्ब ग्राहकांना मिळणार आहे. शिवाय परंपरागत बल्बच्या तुलनेत केवळ सात वॅटचा बल्ब असून त्याचा प्रकाश मात्र साध्या बल्बच्या तुलनेत खूप जास्त राहणार आहे. हे बल्ब ऊर्जा उत्सर्जनसुद्धा कमी करणारे आहेत. येथील वीज कंपनीच्या बसस्थानकाजवळील मुख्य कार्यालयातील बॅडमिंटर हॉलमध्ये रविवारी या उपक्रमाला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमातच वीज ग्राहकांना बल्ब देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)