शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

गुराख्यासाठी म्हशीची बिबट्यावर झेप

By admin | Updated: November 10, 2015 03:05 IST

जनावर ज्याच्या संगतीत राहते, त्याच्यावरच जीव लावते. जीवच लावत नाही, तर प्रसंगी त्याच्यासाठी जीवही देते.

दिवाळीतले अनोखे नाते : माणसांत गुंतला जनावरांचा जीवसुदाम दारव्हणकर रूंझाजनावर ज्याच्या संगतीत राहते, त्याच्यावरच जीव लावते. जीवच लावत नाही, तर प्रसंगी त्याच्यासाठी जीवही देते. बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एका गुराख्यासाठी त्याच्याच कळपातल्या म्हशींनी चक्क बिबट्यावर झेप घेतली. म्हशीचा चवताळलेला अवतार पाहून बिबट्याने धूम ठोकली अन् गुराख्याचा जीव वाचला. ऐन दिवाळीत पांढरकवडा तालुक्यातील गोवारी हेटी जंगलात ही घटना सोमवारी घडली.रूंझा येथून जवळच असलेल्या मोहदा येथील येथील जयवंत वामनराव घाटोळ (२५) हा गुराखी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी जयवंत जनावरांचा कळप घेऊन गोवारी हेटीच्या जंगलात पोहोचला. गाई-म्हशी चरत होत्या. सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका बिबट्याने गुराख्यावर झेप घेतली. त्याच्या पुढे बिबट्या नव्हता, साक्षात मृत्यूच उभा होता. वाचवायला कुणीच नव्हते. बिबट्याने हल्ला केलाच. जयवंत लोळला. त्याच्या पोटावर, छातीवर, मानेवर ओरखडे गेले. जयवंत जिवाच्या आकांताने ओरडला. वाचवा... ऐकायला कोण होते? त्याचाच मुका कळप! त्या कळपाला गुराख्याचे काळीज कळले. कळपातील म्हशी चवताळल्या. बिबट्यावर चाल करून गेल्या. गुराख्याच्या अंगावर झेपावलेल्या बिबट्याला आपल्या मस्तकाचा तडाखा दिला. क्षणभर बिबट्यालाही काही कळले नाही. सावरत त्याने धूम ठोकली ती कायमची. विशेष म्हणजे रविवारी याच बिबट्याने या कळपातील एका गाईवर हल्ला केला होता. पण तेवढ्यात एक म्हैस चवताळून बिबट्यावरच धावून गेली. तिच्या रूद्रावताराने इतर जनावारांचीही भीड चेपली. अख्खा कळपच चवताळलेला पाहून बिबट्याने धूम ठोकली. गाय बचावली. जयवंतला हायसे वाटले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रसंग ओढवला. यावेळी मुक्या जीवांनी त्याचा प्राण वाचविला. त्याच्यावर रुंझाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दोन दिवसानंतर येणाऱ्या गायगोधनाच्या दिवशी हाच गुराखी आपल्या याच गुरांना सजवून दिवाळी साजरी करणार होता. तो आताही करणारच. पण या घटनेनंतर त्याच्या गायगोधनात घट्ट नात्याचा सुगंध जरूर येणार आहे.