शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

पुढाऱ्यांनी अचानक बदलले रंग

By admin | Updated: October 29, 2015 02:57 IST

मारेगाव आणि झरी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुढाऱ्यांचे बदलते रंग जनतेसमोर येत आहे. कालचे मित्र आज वैरी,...

नगरपंचायत निवडणूक : कालचे मित्र झाले वैरी, झरी-मारेगाव येथे प्रचितीवणी : मारेगाव आणि झरी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुढाऱ्यांचे बदलते रंग जनतेसमोर येत आहे. कालचे मित्र आज वैरी, तर कालचे वैरी आज मित्र झाल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे. सामान्य मतदारांना मात्र पुढाऱ्यांच्या या बदलत्या रंगामुळे चांगलेच बुचकाळ्यात टाकले आहे.गेल्या आॅक्टोबर २0१४ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून उभे होते. या निवडणुकीत मोदी लाटेमुळे अनपेक्षितपणे भाजपा उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले. विधानसभा निवडणुकीनंतर चार-पाच महिन्यांपूर्वी येथील वसंत सहकारी संस्थेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत विधानसभेत एकमेकांविरूद्ध लढणारे पुढारी मात्र अचानकपणे एकत्र झाले होते. क्षणात त्यांनी रंग बदलले. ‘वसंत’च्या निवडणुकीत काँग्रेसविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोट बांधली होती. विधानसभेत एकमेकांविरूद्ध लढणारे पुढारी या निवडणुकीत एकवटले होते. त्यांनी काँग्रेसविरूद्ध पॅनल उभे केले. काँग्रेसने एकाकी लढत देत ‘वसंत’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत मनसेने मात्र आपला बाणेदारपणा कायम राखला होता. त्यांनी कुणाशीही हातमिळवणी न करता स्वतंत्रप्रणे पॅनल लढविले होते. त्यांच्या पॅनेलने पराभवास सामोरे जाणे योग्य मानले, मात्र विधानसभेतील प्रतिस्पर्ध्यांशी हातमिळवणी करण्याचे टाळले होते.‘वसंत’च्या निवडणुकीनंतर महिनाभरापूर्वीच इंदिरा सहकारी सुत गिरणीची निवडणूक झाली. या निवडणुकीतही काँग्रेसविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पॅनल उभे केले. या पॅनलला ११ विरूद्ध १0 असे निसटते बहुमतही मिळाले. त्यामुळे हुरळून गेलेल्या काँग्रेस विरोधकांना चांगलेच स्फुरण चढले. सुत गिरणी आता आपल्या ताब्यात आली, या तोऱ्यातच ते वागू लागले होते. तथापि पदाधिकारी निवडीच्या वेळी काँग्रेसने त्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा करून टाकला. विद्यमान आमदारांना अध्यक्षपदापासून दूर लोटत काँग्रेसने त्यांच्याच गोटातील संचालक ओढून सुत गिरणीवरील वर्चस्व कायम राखले. ‘वसंत’ आणि ‘इंदिरा’वर सत्ता स्थापन करण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यानंतर, आता झरी आणि मारेगाव नगरपंचायतीची निवडणूक आली. या निवडणुकीने पुन्हा एकदा विधानसभेत परस्परांविरूद्ध उभे ठाकलेल्या पुढाऱ्यांचे रंग बदलल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंत मनसे वगळता काँग्रेसविरूद्ध एकवटलेले विरोधक मारेगाव येथे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. तेथे काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे स्वतंत्रपणे लढत आहे. एकप्रकारे तेथे विधानसभेची पुनरावृत्ती होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)