शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

एलसीबीकडे ७१ गुन्ह्यांचा तपास

By admin | Updated: June 22, 2014 00:11 IST

स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या तब्बल ७१ गुन्ह्यांचे तपास गोळा झाले आहे. पुरेसे अधिकारी उपलब्ध असूनही या गुन्ह्यांचा तपास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.

यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या तब्बल ७१ गुन्ह्यांचे तपास गोळा झाले आहे. पुरेसे अधिकारी उपलब्ध असूनही या गुन्ह्यांचा तपास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकताना दिसत नाही. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी ही जिल्हा पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा ओळखली जाते. पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील गुन्ह्यांचा तपास या शाखेकडे सोपविला जातो. कधी अन्यायग्रस्त तपासासाठी या शाखेची मागणी करतात. तर कधी पोलीस ठाण्याच्या यंत्रणेवर अविश्वास दाखवून, अकार्यक्षमतेचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक प्रकरणाचा तपास या शाखेकडे सोपवितात. अशा माध्यमातून आतापर्यंत तब्बल ७१ गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पाटीपुरा येथील एका तरुणीच्या तीन महिन्यांपासून बेपत्ता प्रकरणाचा तपासही महिला संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर एलसीबीला सोपविला गेला. त्यात मनदेव घाटातील खून, रामायण हॉटेलमधील कथित आत्महत्या, दादू मिश्रा अशा काही मोठ्या प्रकरणांचा समावेश आहे. प्रल्हाद गिरी यांची बदली झाल्यापासून एलसीबी प्रमुखाचे पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. एलसीबी अंतर्गत अनेक पथके कार्यरत आहे. त्यात चार सहायक निरीक्षक आणि दोन फौजदार असे सहा अधिकारी आहे. दोनच दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली. उपलब्ध अधिकाऱ्यांची संख्या पाहता ७० गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे कठीण नाही. मात्र ते एलसीबीच्या अधिनस्त असले तरी त्यांच्याकडे वेगवेगळी स्वतंत्र जबाबदारी दिली गेली आहे. पर्यायाने महत्वाच्या आणि आव्हानात्मक गुन्ह्यांचे तपास रखडले आहे. एलसीबी अंतर्गत सेवा देणारे काही अधिकारी दारू-जुगारावरील धाडीतच ‘धन्यता’ मानत असल्यानेही तपास मोठ्या प्रमाणात रखडल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)