शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण

By admin | Updated: May 22, 2016 02:17 IST

स्थानिक बसस्थानक चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.

३५ लाख रुपये खर्च : पालिकेच्या निधीतून सौंदर्यीकरण यवतमाळ : स्थानिक बसस्थानक चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण शनिवारी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. आमदार मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण रखडले होते. आपण कार्यभार स्वीकारताच बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षातच हे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला. भीम साम्राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी यासाठी पाठपुरावा केला. प्रारंभी १५ लाख रुपये तरतूद असलेल्या या कामावर जवळपास ३५ लाख रुपये केवळ पालिकेच्या फंडातून खर्च करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष सुभाष राय यांनी यावेळी सांगितले. समाज व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या शहरातील बाबासाहेबांचे हे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील, असा आशावाद आमदार मदन येरावार यांनी व्यक्त केला. यावेळी संविधान अर्पण प्रसंगाचे चित्रशिल्प साकारणारे प्रवीण पिल्लारे, सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करणारे कंत्राटदार बी.बी. कांबळे आणि सदर काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भीम साम्राज्य संघटनेचे प्रतिनिधी हर्षवर्धन खोब्रागडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुदाम धुपे, संचालन राजेश धाये यांनी तर आभार उपअभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले. मंचावर नगरपरिषद नियोजन सभापती शैलेंद्रसिंह बैस, बांधकाम सभापती रेखा कोठेकर, आरोग्य सभापती मंदा डेरे, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती खोब्रागडे, शिक्षण सभापती साधना काळे, स्थायी समिती सदस्य प्रा. प्रवीण प्रजापती, नगरसेवक देविदास अराठे, अमन निर्बाण, पंकज मेश्राम, नगरसेविका डॉ. अस्मिता चव्हाण, नंदा जिरापुरे, प्रणिता खडसे, माजी नगरसेवक अ‍ॅड़ जयसिंह चव्हाण, नगरपरिषदेचे नियोजन विभाग प्रमुख महेश जोशी, डॉ. विजय अग्रवाल, प्रशासन अधिकारी डाफ, कार्यालय अधीक्षक मनोहर गुल्हाने, अभियंता सुप्रिया रिठे, पूजा जाधव, राजेश ढोले, गजानन वातिले उपस्थित होते. (वार्ताहर)