शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

३०२ कोटींच्या अमृत योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: April 14, 2017 02:37 IST

शहरातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत ३०२ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

२४ तास पाणीपुरवठा : बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात येणारयवतमाळ : शहरातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत ३०२ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. बेंबळा प्रकल्पातून योजनेद्वारे मुबलक पाणी मिळणार असून या योजनेचे गुरुवारी नगर परिषद कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नगर परिषदेचे सभापती मोहन देशमुख, नितीन गिरी, सुषमा राऊत, स्थायी समिती सदस्य जगदीश वाधवाणी, जावेद अन्सारी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुरेश चारथळ, दिनेश बोरकर, मुध्याधिकारी सुदाम धुपे यांच्यासह नगरसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यवतमाळ शहरासाठी सध्या असलेली पाणी पुरवठा योजना अपुरी आहे. शिवाय काही गावे शहरात समाविष्ट झाल्याने पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न होता. अमृत अभियानांतर्गत ३०२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. बेंबळा प्रकल्पातून सदर पाणी पुरवठा केला जाईल. दोन टप्प्यात अडीच वर्षात योजनेचे काम पूर्ण होणार आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर यवतमाळ शहरास मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्याच्या हस्ते ई-भूमिपूजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी ई-भूमिपूजन झाले. यवतमाळ नगर परिषदेच्या सभागृहात वेबकास्टद्वारे यवतमाळकरांनी हा आगळावेगळा सोहळा अनुभवला. नगर परिषदेच्या सभागृहात ई-भूमिपूजन सोहळा वेबकास्टद्वारे लाईव्ह पाहण्यात आला.