शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये अद्ययावत मशीनरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:57 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकरत असून इमारतीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आता रुग्णांच्या चाचण्यासाठी आवश्यक मशीनरी येण्यास प्रारंभ आहे. त्यातील मेमोग्राफी मशीन प्राप्त झाली असून विदर्भात पहिल्यांदाच यवतमाळ मेडिकलला मिळाली आहे.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी : मेमोग्राफी मशीन प्राप्त, जुलैपर्यंत साकारणार इमारत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकरत असून इमारतीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आता रुग्णांच्या चाचण्यासाठी आवश्यक मशीनरी येण्यास प्रारंभ आहे. त्यातील मेमोग्राफी मशीन प्राप्त झाली असून विदर्भात पहिल्यांदाच यवतमाळ मेडिकलला मिळाली आहे.ग्रामीण भागात स्तनकॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र निदान करणारी महागडी मेमोग्राफी मशीन विदर्भात एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाही. त्यामुळे गोरगरिब रुग्णांची गैरसोय होत होती. आता एक कोटी ३० लाख रुपयांची मेमोग्राफी मशीन यवतमाळात दाखल झाली आहे. याशिवाय इसीजी, एमआयआर, सिटीस्कॅन या अ‍ॅटोमॅटीक व अद्ययावत मशीनरी आल्या आहेत. थेट दिल्ली येथील आयुर्विज्ञान परिषदेच्या स्तरावरून स्पेशालिटीच्या मशीनरी खरेदी प्रक्रिया केली जात आहे. एका पाठोपाठ एक अशा महत्वपूर्ण मशनरी रुग्णालयासाठी येत आहे. मेमोग्राफी मशीन व इसीजी वापरात काढण्यात आली असून स्थानिक टेक्निशियनला प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही मशनरी ठेवण्यासाठी जागाच नसल्याने इमारत पूर्ण होईपर्यंत परत पाठवाव्या लागल्या आहे. मात्र जागा उपलब्ध होताच त्या परत आणल्या जातील.यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी साकारत असल्याने त्याचा फायदा यवतमाळसह लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे.स्थानिक टेक्नीशियनला प्रशिक्षण देणारअधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी मेमोग्राफी मशीन तात्पुरती अधिष्ठाता कार्यालयालगतच्या जागेत सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. शिवाय इसीजी मशीनचाही वापर केला जात आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच स्पेशालिटीच्या इमारतीचा तळमजला पूर्ण होणार असल्याचे सांगितले. यासर्व मशीनरी तळमजल्यावर लावल्या जाणार आहे. यामध्ये १.५ टेक्झाम असलेली एमआरआय मशीन, डिजीटल स्लाईड असलेला सिटीस्कॅन यांचा समावेश आहे. या मशनरी पुरवठादार कंपनीच्या अभियंत्यांकडून इंस्टॉल केल्यानंतर त्या वापराबाबतचे प्रशिक्षण स्थानिक टेक्निशियनला दिले जाणार आहे. काही आठवड्यातच या मशीनरी रुग्णांच्या सेवेत रूजू होणार आहे. त्यासाठी मेडीकल प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. श्रीगिरीवार यांनी सांगितले.