शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच कृषी केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल, या कंपन्यांची कीटकनाशके सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:01 IST

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.

यवतमाळ : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले.कृषी प्रगती या दुकान, गोदाम तसेच साठा पुस्तकाची ५ आॅक्टोबर रोजी तपासणी केली असता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा परवाना न घेता कीटकनाशक विक्री सुरू असल्याचे आढळले. तेथून १३ लाख रुपयांचा साठा जप्त केला. तर, कृषी वैभव या दुकानाच्या तपासणीनंतर विनापरवाना कीटकनाशकाचा साडेचार लाखांचा माल जप्त केला. त्यानुसार दिलीप बोगावार व दिलीप चिंतावार यांच्यावर वडगाव रोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.कळंब तालुक्यातील सावरगाव येथेही संजय राजा यांच्या जलाराम कृषी केंद्रावर विनापरवाना कीटकनाशक विक्रीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. दारव्हा येथील भेलोंडे एजंसीच्या प्रवीण भेलोंडे यांच्यावर दारव्हा पोलिसात तर अंकिता अ‍ॅग्रो एजंसीचे प्रीतम राठी यांच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘पोलीस तपास करा’राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार श्रीवास्तव हे शनिवारी सकाळीच यवतमाळात दाखल झाले. त्यांनी कृषी, आरोग्य व प्रशासनातील अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या सर्व प्रकरणांचा ‘विषप्राशन’प्रमाणे सखोल पोलीस तपास करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.तपासणीत रॅलीज इंडिया लि., घरडा केमिकल्स मुंबई, इंडोसीस केमिकल्स, युनायटेड पेस्टीसाईड लि. गुजरात, एस.डी.एस. रामसाईड, अदामा इंडिया, बीएएसएफ, इंडिया पेस्टीसाईड लि. लखनऊ या कंपन्यांची कीटकनाशके आढळली असून, त्यांची विनापरवाना विक्री सुरू होती.फवारणीचे जिल्ह्यात २० मृत्यू असून, ४०३ विषबाधितांची नोंद आहे. त्यामुळे कृषी केंद्रांविरुद्ध मोहीम सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी