शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांशी अखेरची बोलणीही ठरली व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागताच जिल्हाध्यक्ष आमदार ...

ठळक मुद्देमनोहरराव नाईकांचा निर्धार कायम : ख्वाजा बेग यांची मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागताच जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी पुसदच्या बंगल्यावर धाव घेऊन अखेरची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नाईकांचे थेट शरद पवारांशी बोलणेही करून दिले. मात्र नाईक शिवसेना प्रवेशाच्या निर्धारावर ठाम राहिले.मनोहरराव नाईक पक्ष सोडणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होती. भाजपमध्ये जाऊन निलय नाईकांना चेकमेट देणार की शिवसेनेत जाणार याबाबतचे तर्क लावले जात होते. मात्र गेल्या आठवड्यात मनोहरराव नाईकांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्धार पक्का झाला. शिवसेनेत प्रवेश करण्याचेही ठरले. त्या अनुषंगाने ‘मातोश्री’वर मुलगा इंद्रनील यांनी भेटी-गाठी घेतल्या. नाईक परिवार शिवसेनेत जाणार असल्याची पक्की बातमी समजल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग शनिवारी सकाळीच पुसदच्या बंगल्यावर पोहोचले. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, पक्ष सोडून जाऊ नका अशी विनंती बेग यांनी केली. एवढेच नव्हे तर आमदार नाईकांचे थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणेही करून दिले. मात्र त्यानंतरही मनोहरराव नाईकांचे मन राष्ट्रवादीत थांबण्याबाबत वळले नाही. आपण शिवसेनेत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नाईकांना राष्ट्रवादीत थांबविण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार ख्वाजा बेग यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली नाही.मनोहरराव नाईकांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर राजकीय स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. मनोहरराव नाईक शिवसेनेत जात असल्याने पुसद विभागात राष्ट्रवादी काँग्रेस संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात मुळातच राष्ट्रवादीची ताकद कमी होती. विदर्भात एकमेव मनोहरराव नाईक हे पक्षाचे आमदार होते. मात्र आता तेही पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी आणखी कमजोर झाल्याचे मानले जाते. त्याच वेळी ज्येष्ठ मंडळी पक्षातून बाहेर पडत असल्याने किमान आता तरी नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा तरुणाईकडून व्यक्त केली जात आहे. नाईक कुटुंबाच्या शिवसेनेत जाण्याने कुणाला काय फायदा होईल व काय नुकसान याचे गणित राजकीय स्तरावर चर्चेतून मांडले जात आहे.माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्यामनोहरराव नाईकांचे समर्थकांना भावनिक आवाहन घरी बसून जनतेची सेवा करणारपुसद : मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, समर्थकांसोबत आपण शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, आतापर्यंत तुम्ही मला सहकार्य केले यापुढे माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहरराव नाईक यांनी केले. आमदार नाईक यांनी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक सोमवारी येथे बोलाविली होती. या बैठकीच्या व्यासपीठावर आमदार मनोहरराव नाईक, पुसदच्या नगराध्यक्ष अनिताताई नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार इंद्रनील नाईक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मनोहरराव नाईक यांनी अवघे दोन मिनिटे संबोधित केले. ते म्हणाले, सत्तेशिवाय लोकांची कामे होत नाही, निधी मिळत नाही म्हणून जो पक्ष सत्तेत आहे त्याच्या सोबत जाणे गरजेचे असते. मी स्वत: घरी बसून लोकांची सेवा पुढेही करत राहणार, मात्र माझ्या दोन्ही मुलांना मला केले तसेच सहकार्य करा, सांभाळून घ्या अशी विनंती आमदार नाईकांनी उपस्थित समर्थकांना केली.