शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

दिग्रस येथील सहकारी संस्थांना अखेरची घरघर

By admin | Updated: April 20, 2015 00:07 IST

‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या.

अनेक बेरोजगार : सहकार क्षेत्र झाले भ्रष्टाचाराचे कुरणप्रकाश सातघरे  दिग्रस‘विनासहकार नही उद्धार’ या उक्तीप्रमाणे दिग्रस तालुक्यात काही वर्षांपूर्वी सहकारी संस्था भरभराटीस आल्या होत्या. शेकडो हातांना काम मिळाले होते. परंतु काही दिवसातच या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण ठरल्या. आज सहकारातील अनेक संस्थांना अखेरची घरघर लागली आहे. सहकारी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे.सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहिले गेले. दिग्रस तालुक्यात अनेक सहाकरी संस्था तत्कालिन नेत्यांनी मोठ्या कष्ठाने उभ्या केल्या. जिल्ह्यातील नामवंत प्रथम क्रमांक असलेली खरेदी-विक्री संस्था अनेक शेतकऱ्यांच्या आशेचे स्थान झाली होती. त्यासोबतच जिनिंग, सहकारी बँका, सोसायट्याही भरभराटीस आल्या होत्या. शेतकरी आपल्या हक्काच्या संस्था म्हणून विकासासाठी धडपडत होते. परंतु काही महाभागांनी या सहकारी क्षेत्राला आपली खासगी मालमत्ता केली. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खावून अनेकजण गब्बर झाले. शेतकरी मात्र आहे त्याच स्थितीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपले खिसे कसे भरता येईल, यावरच सर्वांचा भर दिसतो आहे.तालुक्यातील सहकारी संस्था व सहकारी उद्योगांना घरघर लागली आहे. खरेदी-विक्री संस्था आज भ्रष्टाचाराच्या खाईत गेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, या विवंचनेत आहे. जिनिंग संस्था तीन वर्षांपासून बंद आहे. तिला लिजधारकांनीच कुलूप लावले आहे. आता जिनिंग फॅक्टरीच्या आवारातील गवत विकण्याशिवाय कोणतेच काम नाही. बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोपावर आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कोणतीही योजना राबविली जात नाही. तालुक्याची संजीवनी म्हणून नावलौकिक जिनिंग संस्था अवसायनात काढण्यात आली आहे. सहकारी सोसायट्या व बँकेची अवस्था दयनीय झाली आहे. सहकाराला लागलेल्या ग्रहणाचा परिणाम तालुक्याच्या बाजारपेठेवर होत आहे.कधी काळी कापसासाठी दिग्रसची बाजारपेठ प्रसिद्ध होती. दूरवरून व्यापारी कापूस खरेदीसाठी येत होते. सहकाराच्या माध्यमातून जिनिंग केले जात होते. परंतु आता या संस्थांना अवकळा आल्याने तेथील कामगारांनाही काम मिळत नाही. कामाच्या शोधात शेकडो मजूर परप्रांतात स्थलांतरित होत आहे. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. यातून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटसहकारी संस्थेत शेतकरीच मालक असल्याने शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत होता. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आवाज उठविला जात होता. परंतु आता सहकारी संस्था मोडकळीस आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खुल्या बाजारात विकावे लागते. यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. कुणी आवाजही उठवायला तयार नसतो. रोख पैसे हवे असल्यास कट्टी कापली जाते. खेडा खरेदीत दांड मारण्याचे प्रमाणही वाढले आहे.