शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

पुसद दरोड्याचे तार पेट्रोलपंपावर एलसीबीचा तपास : आरोपी लोकलच

By admin | Updated: June 20, 2015 00:08 IST

पुसदमधील शासकीय कंंत्राटदाराकडे पडलेल्या १० लाख रुपयांच्या सशस्त्र दरोड्याचे तार काळीदौलत येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत असल्याची माहिती आहे.

यवतमाळ : पुसदमधील शासकीय कंंत्राटदाराकडे पडलेल्या १० लाख रुपयांच्या सशस्त्र दरोड्याचे तार काळीदौलत येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत असल्याची माहिती आहे.पुसद येथील रामनगरमध्ये राहणारे कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या घरी सुमारे १० लाखांचा सशस्त्र दरोडा पडला होता. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आणि घरातील सदस्यांना डांबून ठेऊन ऐवज लुटून नेण्यात आला होता. पुसद शहर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहे. मात्र अद्याप त्यांना त्याची दिशा निश्चित करता आलेली नाही. सुमारे दोन आठवडे लोटूनही पुसद पोलिसांना दरोडेखोरांंचा क्लू मिळू शकला नाही. ते हवेतच हात मारत असल्याचे पाहून अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे या दरोड्याचा समांतर तपास सोपविला. पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्या नेतृत्वात एलसीबीने या दरोड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. चिद्दरवार यांच्याकडे पडलेल्या दरोड्याचे तार पुसद ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील काळीदौलत येथे ९ मे रोजी पहाटे ३.३० वाजता शाम प्रतापवार यांच्या प्रभूसाई पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याशी जुळत आहे. तेथून १४ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. हे दरोडेखोर क्रुझर गाडीतून आले होते. संख्येने पाच ते सहा जण होते. पेट्रोल पंप व चिद्दरवार यांच्याकडे पडलेल्या दरोड्यातील कृती मिळती जुळती आहे. शिवाय या दोनही घटनातील दरोडेखोर हे लोकलच असावे अशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. या दरोड्यातील आरोपी एलसीबीच्या नजरेच्या टप्प्यात असून लवकरच ते गजाआड दिसतील असे दाव्याने एलसीबीच्या वर्तुळातून सांगितले जात आहे. हा दरोडा डिटेक्ट करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) क्राईम ब्रँच लागली कामाला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी डिटेक्शनच्या मुद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अर्धाडझन अधिकारी व दोन डझनावर पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला होता. प्रत्येकाची ओळख परेड करून घेऊन त्यांना दारू-जुगारावर धाडी घालणे तुमचे काम नाही, अशा शब्दात समज दिली गेली होती. त्यामुळे गुरुवारपासूनच एलसीबीची यंत्रणा अवैध धंद्यांचा मार्ग सोडून तपासाच्या कामी लागली आहे. सर्व प्रथम त्यांनी पुसदच्या दरोड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या शाखेकडे सुमारे पाऊणशे गुन्ह्यांचे तपास आहेत. त्यात काही खुनाच्या गुन्ह्यांचाही तपास आहे.