शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
6
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
7
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
8
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
11
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
12
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
13
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
14
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
16
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
17
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
18
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
19
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
20
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

‘वसंत’च्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत मोठी वाढ

By admin | Updated: August 17, 2015 02:39 IST

परंपरागत पिकांनी गत तीन हंगामात दगा दिल्याने वसंत सहकारी साखर कारखान्यासह चार साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची प्रचंड लागवड झाली आहे.

महागाव : परंपरागत पिकांनी गत तीन हंगामात दगा दिल्याने वसंत सहकारी साखर कारखान्यासह चार साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची प्रचंड लागवड झाली आहे. मात्र संपूर्ण ऊस गाळपासाठी जाईल की नाही, अशी शंका आता शेतकऱ्यांना लागली आहे. दुसरीकडे वसंत साखर कारखान्याचे चाक फिरते की नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे सुधाकरराव नाईक साखर कारखाना कायमचा बंद आहे.पुसद, महागाव, उमरखेड, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. वसंतमध्ये उसाच्या क्षेत्रात ३०९ हेक्टरची वाढ झाली आहे. एकीकडे आशादायी चित्र असताना दुसरीकडे साखर कारखान्यावर मरगळ आली आहे. वसंत कारखान्याच्या कामगारांना १० महिन्यांपासून पगार नाही. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. असे असताना कारखाना सुरू ठेवण्याची धडपड चालविली जात आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९०५ हेक्टर उसाचे लागवड क्षेत्र आहे. २०१३-१४ मध्ये ५९६ हेक्टर उसाची नोंद होती. २०१४-१५ च्या हंगामात पूर्व हंगामी ३७५.८० हेक्टर आणि खोडवा ४०२ हेक्टर लागवड झाली आहे. वसंतच्या ऊस नोंदणीत ३०९ हेक्टरने वाढ दिसत आहे. अशा स्थितीत विदर्भात एकमेव वसंत सहकारी साखर कारखाना सुरू आहे. उमरखेडच्या शेजारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे चार साखर कारखाने आहे. बागलवाडा, हुतात्मा हदगाव, भाऊराव भोकर आणि डोंगरकडा असे चार कारखाने सुरू आहेत. भाऊराव सहकारी तत्वावर तर तीन कारखाने भाडे किंवा मालकी तत्वावर सुरू आहे. विदर्भातील वसंतची स्थिती नाजूक झाली आहे. गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. मांगूळचा साखर कारखाना डेक्कन शुगरने विकत घेतला आहे. अशा स्थितीत या उसाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. उसाचे क्षेत्र वाढत असताना गाळप क्षमता मात्र तेवढीच आहे. शेतातील ऊस यावर्षी शेतातच जाळावा तर लागणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. (तालुका प्रतिनिधी)