शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आंबेझरी जंगल बनले जनावर तस्करांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:45 IST

ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : हिंगणघाटवरून हलतात तस्करीची सूत्रे, पिक-अप वाहनांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या तस्करीचे मुख्य सूत्रधार हिंगणघाटमध्ये असून तेथूनच सर्व सूत्रे हलत असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.पाणी व चारा टंचाईमुळे गोपालक अल्प किमतीत आपली जनावरे तस्करांच्या हवाली करत आहेत. हिंगणघाट तालुक्यात हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा व आंध्रप्रदेशात नेली जात आहे. त्यासाठी तस्करांनी आंबेझरीच्या जंगलाची निवड केली आहे. वणी उपविभागासह हिंगणघाट परिसरातून आणलेली जनावरे सर्वप्रथम आंबेझरीच्या जंगलात उतरविली जातात. या तस्करीत हिंगणघाट येथील आठ तस्करांचा सहभाग असल्याची माहिती आहे.आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरविल्यानंतर ती जनावरे पायदळ जंगल मार्गाने निमणी, दाभाडी, मांडवा, माथार्जुन, दिग्रसमार्गे तेलंगणा, अदिलाबादकडे नेली जात आहे. यासोबतच पांढरकवडा तालुक्यातील बोरगाव जंगलाच्या पठारावरदेखिल दर रविवारी ही जनावरे उतरविली जात असल्याची माहिती सदर जाणकाराने दिली. तेथून ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा, अदिलाबादकडे रवाना करण्यात येत आहे. तसेच जनावरांची निर्यात करण्यासाठी पिक-अप वाहनांचाही वापर करण्यात येत आहे. जवळपास १० पिक-अप वाहनातूनदेखिल जनावरांची तस्करी केली जात आहे.या तस्करीत मारेगाव येथील आसिफ, तस्लीम, पाटणबोरीतील शागीर, पांढरकवडातील कलीम, कळंब येथील आरिफ, शकीर, तस्लीम यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सोमवार आणि मंगळवारी तस्करीवर अधिक जोर असतो. या तस्करीत दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी आंध्रात जात असले तरी पोलिसांच्या कारवाया मात्र शून्य असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने तस्करीवर टाच आली होती. परंतु अलिकडील काही दिवसात तस्करांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. केवळ ट्रकने जाणाऱ्या जनावरांवरच पोलिसांची नजर असते. नेमका या गोष्टीचा फायदा घेऊनच तस्करांनी जंगल मार्गाने पायदळ जनावरे नेण्याचा फंडा अवलंबला आहे.वन कर्मचारीच बनले खबरेया तस्करांनी काही वन कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन आपले खबरे बनविल्याची चर्चा आहे. जनावरे कोणत्याही मार्गाने सुरक्षित पोहोचतील, याबाबत हे कर्मचारीच या तस्करांना मार्गदर्शन करीत असल्याने तस्करांचा मार्ग सुकर बनला आहे. सहकार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तस्करांकडून मोठी बिदागी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.