शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांचा पैसा गुन्हेगारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:00 IST

कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील पैसा यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात वापरला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका गाजलेल्या खुनातील काही आरोपींसाठी हा पैसा वापरला गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच दबक्या आवाजात बाहेर येत आहे.

ठळक मुद्देअवैध सावकारीतही वापर : रिव्हॉल्वर, वाहने, सोने खरेदी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील पैसा यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात वापरला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका गाजलेल्या खुनातील काही आरोपींसाठी हा पैसा वापरला गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच दबक्या आवाजात बाहेर येत आहे.यवतमाळात भूमाफियांचा हैदोस सुरू आहे. दुर्लक्षित भूखंडांचे परस्परच मालक बदलवून त्या प्रॉपर्टी बँकांमध्ये तारण ठेवल्या जात आहे. त्याद्वारे कोट्यवधींच्या रकमा कर्ज म्हणून उचलल्या जात आहे. हाच पैसा गुन्हेगारी जगतात वापरुन गुन्हेगारी टोळ्या आपले वर्चस्व निर्माण करीत आहे. एका बँकेतून उचलल्या गेलेल्या तीन कोटींच्या कर्जामधून गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांसाठी महागडी वाहने, अग्नीशस्त्रे (रिव्हॉल्वर), सोन्याचे चेन, कडे, ब्रासलेट आदी खरेदी केले गेल्याचे बोलले जाते. यातीलच पैसा यवतमाळच्या बाजारपेठेत अवैध सावकारीसाठी वापरला गेला आहे.सावकारीचे पुरावे मशीनमध्येतीन कोटी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेत एक डीआरडी एजंट आहे. त्याचे नाव वेगळे आणि एजंसी आपल्याच समकक्ष दुसºयाच्या आडनावाने आहे. त्याच्या घरी धाड घातल्यास कोरे स्टॅम्प, बोगस शिक्के, खरेदी खत, बँकेची डीआरडीची मशीन सापडण्याची शक्यता आहे. त्या मशीनमधील डेटा तपासल्यास अवैध सावकारीचे पुरावे त्यात मिळू शकतात.एजंट-अधिकाºयाचे संगनमतसदर एजंट व त्या बँकेतील एक अधिकारी चांगले मित्र आहे. त्यामुळेच त्या बँकेतून गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सहज कर्ज उपलब्ध होते. तीन कोटींच्या कर्जाचा हा प्लॅनसुद्धा या एजंट व अधिकाºयानेच संयुक्तपणे बनविला.नवख्यांकडे रिपोर्टची जबाबदारीभूखंडाची किंमत (व्हॅल्युएशन) वाढविण्यासाठी डिप्लोमा होल्डर इंजिनिअरकडे तर सर्च रिपोर्टसाठी अशाच एका नवख्या तज्ज्ञाकडे या बँकतून पाठविले जाते. लाभाचे पाट १८९ किलोमीटरपर्यंत वाहत असल्याने वरिष्ठाचा आपल्या या कनिष्ठावर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासातूनच अशी बोगस कर्ज प्रकरणे मंजूर केली जात आहे.विड्रॉल करणारे बँकेच्या सीसीटीव्हीत कैदउचललेल्या कर्जाचा वापर गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसाठीच केला गेला की नाही, याची खातरजमा खालील पद्धतीने करता येईल.गाजलेल्या खुनातील आरोपींना जामीन मिळाला, नेमका त्याच वेळेस तीन कोटींच्या कर्जातील रकमेची उचल झाली काय, त्याच्या तारखा जुळविता येतील.या कर्जाच्या रकमेची विड्रॉल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींचे चेहरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासता येतील.रक्कम एकाच वेळी उचलली गेली का, त्यातून नेमकी कोणत्या ज्वेलर्समधून सोने खरेदी केली गेली, त्याचे बिल आहे का आदी बाबी आरोपींच्या अटकेनंतर तपासल्या जाऊ शकतात.