शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

उद्योगाच्या नावावरील जमिनी धूळ खात

By admin | Updated: December 8, 2015 03:35 IST

शहरानजीकच्या लोहारा, पांगरी व भोयर येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रापैकी लोहारा व पांगरीची जमीन चुकीने व

यवतमाळ : शहरानजीकच्या लोहारा, पांगरी व भोयर येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रापैकी लोहारा व पांगरीची जमीन चुकीने व जबरदस्तीने संपादित करण्यात आली असून १९ वर्षांपासून पडून असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. पूर्वीच्या औद्योगिक क्षेत्राच्या अलीकडे लोकवस्तीला लागून व यवतमाळ नगर परिषद हद्दीजवळ अकृषक दर्जाची जमीन परत करण्यात यावी व प्रस्तावित लेआऊट रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोहारा व पांगरी बाधित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बोरखडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात काही महत्वपूर्ण मुद्यांवर कृती समितीने प्रकाश टाकला आहे. त्यानुसार जुन्य मूळ औद्योगिक क्षेत्राच्या अलिकडे यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीजवळ तीन किलोमिटरच्या आत प्रदूषणाच्या दृष्टीने लोकवस्तीजवळ अशा पद्धतीने यवतमाळव्यतिरिक्त कुठेही जमीन संपादित केलेली नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. भोयरची जमीन पूर्वीच्या औद्योगिक क्षेत्राच्या पलिकडे आहे तसेच अंदाजे ४५० एकर जमिन शिल्लक आहे. तेथीलही काही कारखाने बंद पडलेले आहे. मूळ औद्योगिक क्षेत्रातसुद्धा अनेक उद्योग बंद असून बरीच जमीन शिल्लक आहे तसेच काही रिकामे भूखंडसुद्धा पडून आहेत. लोहाऱ्याच्या पुढे व भोयरला लागून आजही सरकारी जमिन उपलब्ध आहे. १५ वर्षांपर्यंत जमिनीचा वापर न केल्यास बाधित शेतकऱ्यांना अशा जमिनी परत कराव्यात असे शासनाचे राजपत्र असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. २०१३ च्या कायद्यात जमिनीच्या उपयोगाची मर्यादा पाच वर्षच आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही आदेश काढले आहेत की, उद्योगासाठी संपादीत केलेली जमिन १० वर्षात उपयोगात आणली नसेल तर ती मूळ शेतकऱ्याला परत करण्यात येईल, उद्योगांसाठी संपादित केलेल्या या जमिनीचे ९० टक्के मालक शेतकरी, आदिवासी व ओबीसी आहेत. अतिरिक्त संपादित जमिनीवर १७ वर्षांपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार जर ह्या जमिनी मूळ मालकांना परत करू शकत नसेल तर आजच्या बाजारभावाच्या पाचपट व २५ टक्के विकसित जमिन त्वरित देण्याची व्यवस्था शासनाने करावी, कारण संपादित जमिनी १९ वर्ष उलटूनही उपयोगात आणल्या गेल्या नसल्याचे बाधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या आंदोलनात लोहारा व पांगरी प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव बोरखडे यांच्यासह गणपतराव काळे, नीलेश शिरभाते, अरुण शिरभाते, राजेंद्र वाडीवा, अशोक गुल्हाने, सुशीला शिरभाते, शुभांगी बोरखडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)