शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:11 IST

पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.

ठळक मुद्देबोंडअळीच्या मदतीत खोडापाच वर्षांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरणारयवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी बाद राज्य शासनाच्या अफलातून अध्यादेशाने जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार शेतकरी मदतीला मुकणार आहे. ११९ कोटी ५१ लाख ६५ हजार रूपयाच्या मदतीला ते मुकणार आहे.

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुलाबी बोंडअळीची मदत देताना पाच वर्षाचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना आहेत. पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी ३७ हजार ५०० रूपयांची मदत जाहीर केली. यासंदर्भात महसूल, वन विभागाने धक्कादायक अध्यादेश काढला. या अध्यादेशात हेक्टरी ६८०० रूपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याकरिता पाच वर्षांचे सरासरी उत्पादन ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत झालेले नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त राहिल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसानीचे प्रमाण ३३ टक्केपेक्षा कमी राहिल्यास शेतकरी अपात्र ठरविण्याच्या सूचना आहेत. यामुळे सर्वेक्षणातून मदतीस पात्र ठरलेले शेतकरी हेक्टरी सरासरीच्या उत्पादन मर्यादेने बाद झाले आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मदतीमधून बाद होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा लाखांच्या घरात आहे.ब्रिटिशकालीन आणेवारी घातकचआणेवारीकरिता ब्रिटिशकालीन पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पध्दती बदलविण्यासाठी मंत्री, आमदारांनी आंदोलन केले होते. प्रत्यक्षात सत्तांतरानंतरही ब्रिटिशकालीन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. याच पद्धतीच्या अवलंबाने २० जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस