शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लाडका टमू आईला मुकला... पिंजऱ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:28 IST

बारा वर्षे आईच्या लाडात वाढलेला टमू आता अचानक आईपासून दूर गेला आहे... त्याला यवतमाळातून नेऊन वर्ध्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेले आहे. तो आईच्याच हातचे जेवण घेतो.. म्हणून आई बिचारी दररोज यवतमाळातून त्याचा टिफिन घेऊन जाते. त्याला स्वत:च्या हाताने भरवते अन् माझा टमू मला परत द्या, म्हणून विनवणी करते... पण नियम आडवे येतात अन् आईला रिकाम्या हाताने दररोज परत यावे लागते..

ठळक मुद्देअनोखे नाते : वनविभागाच्या नियमाने केली ‘माय-लेकरा’ची ताटातुट

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बारा वर्षे आईच्या लाडात वाढलेला टमू आता अचानक आईपासून दूर गेला आहे... त्याला यवतमाळातून नेऊन वर्ध्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेले आहे. तो आईच्याच हातचे जेवण घेतो.. म्हणून आई बिचारी दररोज यवतमाळातून त्याचा टिफिन घेऊन जाते. त्याला स्वत:च्या हाताने भरवते अन् माझा टमू मला परत द्या, म्हणून विनवणी करते... पण नियम आडवे येतात अन् आईला रिकाम्या हाताने दररोज परत यावे लागते..या आईचे नाव आहे निलिमा पुंडलिकराव सवईकर आणि ज्या टमूसाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटतोय, तो आहे बारा वर्षाचा माणसाळलेला वानर! निलिमातार्इंनी जोजविले तरच टमू झोपतो. जेवतो. खुश राहतो. निलिमातार्इंच्या घरात टमूसाठी खास रूम आहे. तो टीव्ही पाहतो. ज्या एकवीरा नगर परिसरात निलिमाताई राहातात, तेथील बच्चे कंपनीही त्यांना ‘टमूची मम्मी’ म्हणूनच ओळखतात. पण या मायलेकरांच्या अतूट नात्यात आता नियम आडवा आला आणि त्यांची ताटातुट झाली.निलिमातार्इंनी टमूला लौकिक अर्थाने जन्म दिला नसला तरी, त्यांनीच त्याला जीवन दिले आहे. झाले असे की, १२ वर्षांपूर्वी यवतमाळ-आर्णी मार्गाने प्रवास करत असताना त्यांनी एक अपघात डोळ्यादेखत पाहिला. भरधाव ट्रकखाली एक गर्भवती माकडीण चिरडली. ते पाहून निलिमाताई थांबल्या. माकडीणीच्या पोटातून बाहेर आलेली आतडी हलताना त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर गर्भातून बाहेर पडलेला छोटा जीव त्यांना दिसला. माकडीणीचं ते बाळ निलिमाताईनी लगेच यवतमाळात आणलं. स्वत:च्या घरी त्याची शुश्रूषा सुरू केली. तीन वर्षे डॉ. अलोणे यांच्याकडून उपचार करवून घेतले. बरा होता होता आणि मोठा होता होता हा वानर सवईकर कुटुंबाचाच एक सदस्य बनला. त्याने वानरांची दुनियाच पाहिली नाही. पाहिले ते माणसांचेच कुटुंब.टमूच्या सर्व सवयी, आवडी, जेवण, वावर माणसांसारखाच. निलिमाताई सांगतात, टमू फक्त माणसांसारखा बोलू शकत नाही. पण त्याचे डोके दुखले तर तो डोके पुढे करतो. मग आम्ही त्याचे डोके दाबून देतो. त्याचे हातपाय दुखले तर चेपून देतो. अनेकदा तर त्याला मांडीवर घेऊन निजवावे लागते. आम्ही त्याच्यासाठी ५ बाय २० अशी रूम बांधली. टीव्ही पाहायला त्याला आवडते. झोपण्यासाठीही त्याला वाकळ, ब्लँकेट लागतेच. रोजच्या जेवणात त्याला कढी, दही पाहिजेच. तीन पोळ्या, ब्रेड हा त्याचा आहार आहे. तो मनात येईल तेव्हा खात नाही. त्याच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या आहे. पण त्याला मोठा आवाज मात्र सहन होत नाही.निलिमाताईची मुले सोनाली आणि प्रतिक यांचाही टमूशी मोठा लळा आहे. चक्क १२ वर्षे त्यांनी हे वानर एखाद्या मानवी लेकरासारखेच सांभाळले. पण अचानक कुणीतरी वनविभागाकडे तक्रार केली आणि १० मार्चच्या सायंकाळी वनविभागाने टमूला नेले. यवतमाळात त्याची सोय होत नाही, म्हणून वर्ध्याच्या ‘प्युपल रेस्क्यू सेंटर’मध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. पण ‘रेस्क्यू’ होण्यापेक्षा टमूची अडचण झाली आहे. निलिमाताईच्या हातचे अन्नच त्याला लागते. त्याशिवाय तो दुसरे काही खात नाही. हे वनविभागाला माहीत नसले तरी निलिमातार्इंना माहीत आहे. रोज त्या यवतमाळातून त्याचा टिफिन घेऊन वर्ध्यात जातात. कधी त्यांचा मुलगा प्रतिक जातो. सकाळ आणि सायंकाळ असे दोन वेळा त्याला जेवू घालून परत येतात. मधल्या वेळात टमूला एकटे वाटू नये म्हणून त्याच्या पिंजºयापुढे बसून त्याच्याशी गोष्टी सांगतात.आता दोन-तीन वर्षे तरी त्याला जगू द्या!टमू आईच्या पोटातून थेट माझ्या पदरी आला. १२ वर्षे तो मलाच आई मानून मोठा झाला. आज वनविभागाने त्याला ताब्यात घेतले. पण वानराचे आयुष्यच फार तर १५ वर्षे असते. आता टमूच्या जीवनाचे तीन चार वर्ष उरले. ते त्याला पिंजऱ्यात किंवा जंगलात का जगायला लावता? टमूला शेवटपर्यंत माझ्या घरी राहू द्या, अशी आर्त विनवणी निलिमा सवईकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. टमू आपल्यापासून दूर गेल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांना अक्षरश: धारा लागल्या होत्या.