शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

शासकीय कार्यालयांमध्ये शौचालयांचा अभाव

By admin | Updated: March 20, 2015 01:56 IST

एकीकडे शासन घरोघरी शौचालय योजना राबवित आहे. त्यासाठी अनुदानही देत आहे. मोठमोठ्या जाहिराती सुरू आहे.

वसंतनगर : एकीकडे शासन घरोघरी शौचालय योजना राबवित आहे. त्यासाठी अनुदानही देत आहे. मोठमोठ्या जाहिराती सुरू आहे. असे असताना शासनाच्या शासकीय कार्यालयांमध्येच शौचालयांचा अभाव असल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसून येते. शासनाच्या अनेक कार्यालयांमध्ये शौचालयेच नाही. त्यामुळे तेथे आपल्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अशा कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबना तर न विचारलेली बरी. दिग्रस तालुक्यात शासनाचे विविध कार्यालये आहेत. यातील अनेक कार्यालयांमध्ये शौचालयांचा अभाव आहे. काही कार्यालयांमध्ये शौचालय आहेत. परंतु ते कुलूपबंद आहे. तर काही कार्यालयातील शौचालयांची इतकी दुरावस्था झालेली असते की त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत नाही. नियमित साफसफाईअभावी शासकीय कार्यालयांमधील शौचालयांमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा ठिकाणी शौचास गेल्यामुळे विविध आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यापेक्षा इतरत्र गेलेले बरे, अशी तेथील कर्मचाऱ्यांची मनस्थिती आहे. अनेक कार्यालयातील शौचालये ही पान, तंबाखू व गुटखा खालल्यानंतर थुंंकल्यामुळे रंगलेली दिसतात. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसून येतो. त्यामुळे तेथील पाणीदेखील जात नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात डासांची पैदास अशा ठिकाणी होताना दिसते. एकीकडे शौचालय बांधा घरोघरी असा नारा शासन लावत असताना शासनाच्या स्वत:च्या कार्यालयात मात्र विपरित परिस्थिती आहे. शौचालयांच्या अभावामुळे सर्वाधिक कुचंबना ही महिला कर्मचाऱ्यांची होते. या बाबत वारंवार सूचना करूनही त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. केवळ शासकीय कार्यालयांमध्येच नव्हेतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्थिती अतिशय वाईट आहे. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये साधे मूत्रिघरही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांचीही चांगलीच कुचंबना होते. जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून घरोघरी शौचालय ही योजना राबविली जाणे म्हणजे थोतांड असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहे. जिल्हा परिषदेने आपल्या विविध कार्यालयात तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शाळांमधील परिस्थिती आधी सुधारावी आणि विद्यार्थी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)