शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव

By admin | Updated: May 20, 2017 02:37 IST

महागावच्या कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असून कृषी सहायकांची दहा पदे रिक्त आहे.

शेतकरी हैराण : कृषी सहायकांची दहा पदे रिक्त लोकमत न्यूज नेटवर्क गुंज : महागावच्या कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असून कृषी सहायकांची दहा पदे रिक्त आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी हैराण झाले आहे. कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध योजना तालुका कृषी कार्यालयातून दिल्या जातात. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयात कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचणे कठीण झाले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर गाडा सुरू आहे. यासोबतच काळी दौ., फुलसावंगी, महागाव येथील मंडळ कार्यालयातही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. तालुक्यात २७ कृषी सहायकांची आवश्यकता आहे. परंतु सतराच कृषी सहायक येथे कार्यरत आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी सहायक मिळत नाही. शेतकऱ्यांचे कोणतेही काम होत नाही. परिणामी तालुक्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांच्याशी संपर्क साधला असता कर्मचारी कमी असून याबाबत वरिष्ठांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु अद्याप कर्मचारी मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. खरीप तोंडावर मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये होताच शेतकरी उत्साहीत झाले आहे. खरिपाच्या तयारीला लागले आहे. मात्र महागाव कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कृषी विभाग खरिपात कसे मार्गदर्शन करणार, असा प्रश्न आहे.