शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावतीच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:56 IST

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे. शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता.

ठळक मुद्देशेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : कालवे फुटले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पाणी वाहून जात आहे.शेती सिंचनासाठी अरुणावती प्रकल्प वरदान ठरला होता. मात्र सध्या या प्रकल्पाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. प्रकल्पाचे कालवे जागोजागी फुटले आहे. त्यातून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आपल्या डोळ्यादेखत पाणी वाया जात असल्याने बघून शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकण्यासाठी कुणीही पुढे येण्यास तयार नाही.पाणी वाया जात असल्याने सिंचन कमी होत आहे. यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. संबंधित अधिकारी कालवे दुरुस्तीसाठी पुरेसा निधी देण्यास शासन तयार नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. संपूर्ण कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना शासन अपुरा निधी देत आहे. त्यामुळे कालवे दुरुस्ती परिपूर्ण होत नाही. परिणामी लाखो लीटर पाणी वाया जात आहे.एकीकडे शासन पाणी अडवा-पाणी जिरवाचा घोषा लावून पाणी साठविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे लाखो लीटर पाणी साचून वाया जात असताना उपाययोजना केल्या जात नाही. पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. निधी खेचून आणण्यास ते असमर्थ ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. पीके वाळत असल्याने ते त्रस्त आहे.पाणी अडवा-जिरवाशासनातर्फे राज्यात ठिकठिकाणी पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, बंधारे बांधणे, नाला सरळीकरण आदी कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी लोकसहभाग घेतला जात आहे. याच धर्तीवर आता अरुणावतीचे पाणी बचत करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी अडवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी आता शासनासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून चंचित राहणार आहे.

टॅग्स :Arunavati Damअरुणावती धरण