शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 16, 2015 02:25 IST

ले-आऊटला परवानगी देताना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्याचे नकाशात दाखविण्यात येते,

यवतमाळ : ले-आऊटला परवानगी देताना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्याचे नकाशात दाखविण्यात येते, ग्राहकांनाही सर्व सुविधा पुरविण्याचे आमिष दाखविले जाते नंतर मात्र भूखंड विकून रग्गड पैसा कमावून हात वर केले जाते. सध्या शहरात असा प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसते. प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खिसे गरम करून परवानगी ले-आऊटची परवानगी मिळविली जाते. परंतु कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. भूखंड खरेदी करणारे गोरगरीब, मध्यमवर्गीय नागरिक आपली तक्रार करू शकत नाही, तसेच आपल्याला न्यायालयातही खेचू शकत नाही, याची पूर्ण खात्री असल्याने भूखंडधारकांचा हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ले-आऊटच्या धंद्याला उधाण आले आहे. ले-आऊटला परवानगी मिळाल्यानंतर भूखंडाची विक्री केली जाते. भूखंड विक्रीपूर्वी ग्राहकांना गुळगुळीत असे माहितीपत्रक दाखविण्यात येते. त्यामध्ये लाईट, पाणी, रस्ते, गार्डन व इतरही बरेच काही दाखविण्यात येते. प्रत्यक्षात अनेकजण यापैकी कोणत्याही सोयीसुविधा पुरवित नाही. नकाशात या सोयीसुविधा दाखवून परवागनी मागितली जाते. ती लवकर मिळावी आणि नंतर कुणीही तपासणीसाठी येऊ नये, यासाठी सबंधित नगर परिषद व ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांचे हात ओले केले जातात. अशा पद्धतीने रग्गड पैसा कमावून भूखंड खरेदी करणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचे दिसून येते. नंतर मात्र भूखंड खरेदी करणाऱ्यांना नगर परिषद किंवा ग्रामपंचायत उभे करीत नाही. त्यांचे म्हणणेही ऐकल्या जात नाही. तेंव्हा नागरिकांनीच भूखंड खरेदी करण्यापूर्वी सर्व प्रकारची पडताळणी आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, हे पाहणे योग्य ठरणार आहे. त्यानंतरही नियमाप्रमाणे सोयीसुविधा नसल्यास रितसर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण लेआऊटमध्ये लाईन, पाणी, रस्त्यासह इतर अनेक प्रकारच्या आवश्यक व मूलभूत सोयीसुविधा पुरविणे हे लेआऊटधारकाचेच काम आहे. (प्रतिनिाधी)