शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेचे मजूर उधारीवरच राबलेत कामावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:59 IST

४० कोटी रुपये थकीत : १५ दिवसांत मजुरीच्या दाव्याला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रोजगार हमी योजनेच्या कामावर राबल्यास १५ दिवसांत मजुरी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. प्रत्यक्षात 'रोहयो'च्या मजुरांना उधारीवरच कामावर राबविले जात आहे. तीन महिने उलटूनही मजुरी मिळत नसल्याने मजुर वर्गात निराशा आहे. २९ मे पासून ४० कोटी रुपयांचा निधी आला नाही. यामुळे शासनाकडे निधीची टंचाई आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात साडेसहा लाख जॉबकार्डधारक असून, मजुरांची संख्या १३ लाख ६० हजार इतकी आहे. जिल्हाभरात भर उन्हाळ्यात घाम गाळून कामावर राबलेल्या मजुरांना वारंवार मजुरीच्या उधारीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जिल्ह्यात मोठा उद्योग नसल्याने मजुरांना रोजगाराच्या शोधात गाव सोडून स्थलांतरित व्हावे लागते. अन्यथा गावात, परिसरात मिळेल ते काम कमी मजुरीत करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुल, सिंचन विहीर, फळबाग लागवड, पांदणरस्ते आदी कामे सुरू करण्यात आली होती. उन्हाळ्यात शेतीची कामे बंद होती. यामुळे हजारो मजुरांना रोजगार हमी योजनेच्या कामाचा आधार मिळाला. २९७ रुपये मजुरीचे दर आहेत. त्यात वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे आणि त्यात भरीस भर म्हणजे तीन-तीन महिने प्रतीक्षा करूनही मजुरी मिळत नाही. १५ दिवसांत मजुरीच्या दाव्यालाच हरताळ फासला जात आहे. असेच चित्र राहिल्यास आगामी काळात 'रोहयो'च्या कामावर मजुरांची टंचाईच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता कामे घटलीसध्या पावसाळा सुरू असल्याने रोजगार हमी योजनेच्या कामात कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यात केवळ दोन हजार १०३ कामे सुरू आहे. यात घरकुल, वृक्षलागवड, गोठा बांधकाम आदी तुरळक कामाचा समावेश आहे.

कुशलचे १० कोटी अडकलेअकुशच्या निधीसोबत कुशलचेही १० कोटी अडकले आहेत. पूर्वी रोहयोचा निधी नियमित येत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून निधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनापुढचा पेचही वाढत चालला आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ