शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोविडयोद्धांना नुसताच ‘मान’ मानधन थकले ! अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

कोरोना काळात डाॅक्टर, इसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता अधिपरिचारिका या पदांवर ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत अनेकांना कमी करण्यात आले. आता अलीकडे यातील २५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणारे कोरोना योद्धे कामावरून कमी करताना मानधन न मिळाल्याच्या प्रकाराने संतप्त झाले. 

ठळक मुद्दे२५० कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले : काहींना तात्पुरती नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा तोकडी पडल्याने आरोग्य विभागाने कंत्राटी पदभरती करून साथ थोपविण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. आता कोरोना संपल्यानंतर यातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, तर काही दिवसांनंतर काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती मिळाली आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. कोरोना काळात डाॅक्टर, इसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता अधिपरिचारिका या पदांवर ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत अनेकांना कमी करण्यात आले. आता अलीकडे यातील २५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणारे कोरोना योद्धे कामावरून कमी करताना मानधन न मिळाल्याच्या प्रकाराने संतप्त झाले. अडचणीच्या काळात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. यामुळे ते आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय यातील काही कर्मचाऱ्यांना अजूनही रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांनी मानधनाची आणि नियुक्ती मागणी केली आहे.

आर्थिक तरतुदीअभावी मानधन अडखळलेकोविडमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन वितरित करताना दर महिन्यास विलंब लागला आहे. एका महिन्याचे मानधन दुसरा महिना अर्धा संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पडले आहे.सर्वात अखेरच्या महिन्यात ज्या कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले त्याला आर्थिक तरतुदीचा अडथळा आहे.राहिलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच मानधन उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला मिळेल.

मान दिल्याने पोट नाही भरतआम्हाला नोकरीवरून कमी केले. तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. काढताना काम केलेल्या दिवसाचे वेतनही मिळाले नाही. आता बेरोजगारी आणि कामाचा शोध सुरू आहे. आम्हाला मानधन मिळाले असते तर अडचणी दूर झाल्या असत्या. सर्वांनाच कामावर घ्यावे.- फैजान दानिश, कर्मचारी

आरोग्य विभागाला तिसरी लाट येणार असल्याची माहिती आहे. यानंतरही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आरोग्य विभागाने अनुभवी कर्मचाऱ्यांना कायम ठेवायला पाहिजे होते. याशिवाय राहिलेले मानधनही द्यायला हवे.  - डाॅ. शारीवाह अन्नदाते

जूनचे मानधन अद्याप मिळाले नाही. आम्हाला नियुक्ती देतानाच काम नसल्यास काढण्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या. कामावरून कमी झाल्यानंतर तत्काळ जाॅब मिळत नाही. तरी अनेकजण खासगी नोकरी करीत आहे, तर काही शोधात आहे. - डाॅ. किंजल पटेल

सध्या काम नाही, काम उपलब्ध होताच आवश्यकतेनुसार भरती होईलआरोग्य विभागाने काम नसलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले. तिसऱ्या लाटेमध्ये आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना नियुक्ती देतानाच आवश्यकतेनुसार कामावर ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसा बाँड त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या सोळा ठिकाणी केंद्र सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचे मानधन नेमके कशामुळे थांबले याची मला कल्पना नाही. मात्र, ग्रॅन्डअभावी मानधन थांबले असावे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात कामकाज पूर्ण केले. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला लवकरच मिळेल. आरोग्य विभागाकडे याबाबत विचारणा करण्यात येईल. माझ्याकडे सध्या तरी या प्रकरणात काही तक्रारी आलेल्या नाही. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मानधन मिळेल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या