शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहाचा झाला कोंडवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:02 IST

वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा भोजनावर बहिष्कार : आंदोलनानंतर पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.वडगाव परिसरात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. त्यात २५० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. मात्र अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये त्यांना ठेवले जात आहे. प्रत्येक खोलीत क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी आहेत. ही वास्तू बदलून दुसऱ्या ठिकाणी निवास व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. वसतिगृहातील गाद्या फाटल्या आहे. भोजनाची व्यवस्थाही चांगली नाही. त्यामुळे भोजनाचे कंत्राट बदलण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली. सकस आहार योजनेतून फळ देण्याच्या सूचना असताना केवळ एक केळी दिली जाते. भोजन बनविताना तांदूळ, डाळ, गहू निकृष्ट वापरले जातात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या समस्यांकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी समोवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले.या आंदोलनात वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी सहभागी झाले. डॉ.अरविंद कुडमेथे, पृथ्वीराज पेंदोर, अनिल लडके, दामाजी मेंडके, सूरज कोडापे, ज्ञानेश्वर मडावी, संदेश कुडमेथे, विशाल कुरकुटे, अशोक राजने, अमोल मेश्राम, जगदीश कुंभेकार आदींनी नेतृत्व केले. आंदोलनाची दखल घेत दुपारी पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी एस. भुवनेश्वरी आंदोलनस्थळी पोहोचल्या. त्यांनी सर्व समस्या आठ दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.