शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुरगाव येथील रंगाविना धुलीवंदनाची ज्ञानयज्ञाने सांगता

By admin | Updated: March 15, 2017 00:16 IST

सुरगाव येथे गत २९ वर्षांची परंपरा जोपासत रंगाविना धुलीवंदन साजरे झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ......

तीन दिवस विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम : २० वर्षांची परंपरा जोपासत सुरगावात झाले रंगली धुळवड सेलू : सुरगाव येथे गत २९ वर्षांची परंपरा जोपासत रंगाविना धुलीवंदन साजरे झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील प्रत्येक ओळीला जीवन मानणाऱ्या सुरगावकरांनी अभिनव धुलीवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी केलेली धडपड यंदाही लोकांनी डोळ्यात साठविली. सतत तीन दिवस चाललेल्या समाजप्रबोधन व विविध सामाजिक कार्यक्रमाची मेजवाणी ग्रामस्थ व पाहुण्यांना तृप्त करून गेली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा समादेशक गृहरक्षक दल मोहन गुजरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेशदादा मांडळे, बा.या. वागदरकर, प्रफुल लुंगे, एम.बी. महाकाळकर, उकेश चंदनखेडे यांची उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रम धुलीवंदनाच्या दिवशी झाला. सकाळी गावकरी, महिला, पुरूष व लहान मुले व महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले पाहुणे नाम-धूनमध्ये सहभागी झाले. शिस्तबद्ध व पुरूष, मुलांच्या डोक्यावर भगव्या टोप्या होत्या. नामधून प्रभातफेरीचे एक टोक कार्यक्रमस्थळी पोहोचते तेव्हा शेवटचे टोक गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात. एवढी प्रचंड नामधून पाहून सर्व उपस्थित पाहुणेही भारावून गेले. गाव दिवाळीसारखे सजले होते. तोरण, पताका, गेट, कमाणी व रांगोळींनी रस्ते फुलून गेले होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक मोहन अग्रवाल तर अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदर्श गाव लेखामेंढा जि. गडचिरोलीचे देवाजी तोफा, अण्णा हजारे यांच्या ट्रस्टचे विश्वस्त डॉ. शिवना कुंभारे गडचिरोली, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, डॉ. उल्हास जाजू, अनिल नरेडी, ठाणेदार संजय बोंडे, प्रफुल लुंगे, सुबोधदादा अड्याळ टेकडी, भाऊसाहेब थुटे, अवचित सयाम, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, समाजसेवक सुनील बुरांडे, एम.बी. महाकाळकर, बा.दे. हांडे, बा.या. वागदरकर, सुरेशदादा मांडळे, चिन्मय फुटाणे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सप्तखंजेरीवादक प्रवीण महाराज देशमुख यांनी संपूर्ण गावाला राष्ट्रसंताच्या विचाराने एकत्र करीत मोठे परिवर्तन केले. याबद्दल गौरवोद्गार काढत संपूर्ण महाराष्ट्रात रंगाविना धुळवडीच्या उपक्रमात सातत्य ठेवल्याबद्दल कौतुक केले. प्रास्ताविक लुंंगे यांनी केले. प्रवीण महाराज देशमुख यांच्या वृद्ध आईने आयुष्यभर जमविलेली २० हजारांची रक्कम या उपक्रमाला भेट दिली. स्वत:ची तेरवी व कर्मकांड न करण्याबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन प्रियंका देशमुख व शुभम मेहता यांनी केले. आभार प्रमुख प्रवीण महाराज देशमुख यांनी मानले. रात्री त्यांच्या सप्तखंजेरी वादनाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने तीन दिवस चालेल्या या ज्ञानयज्ञाचा समारोप करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)