ज्ञानसाधकांची झुंबड : यवतमाळ शहराला तशी गर्दीची नव्हाळी नाही. दीड महिन्यापूर्वीच नवरात्रोत्सवात रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा शहर गजबजले आहे. पण यावेळची गर्दी भाविकांची नाही तर ज्ञानसाधकांची आहे. जिल्हा परिषद पदभरतीची परीक्षा देण्यासाठी हजारो तरुण-तरुणी यवतमाळात डेरेदाखल झाले. बसस्थानकावर तर तुफान गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना थेट खिडकीतूनच बसमध्ये ‘एंट्री’ घ्यावी लागली.
ज्ञानसाधकांची झुंबड :
By admin | Updated: December 3, 2015 02:49 IST